google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार....गाढ झोपेत असताना मुलाने केला वडिलांचा खून

Breaking News

धक्कादायक प्रकार....गाढ झोपेत असताना मुलाने केला वडिलांचा खून

 धक्कादायक प्रकार....गाढ झोपेत असताना मुलाने केला वडिलांचा खून


पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलाने वडिलांचा कात्रीच्या सह्याने सपासप वार करुन खून केला. यावेळी वडिलांवर कात्रीने वार करत

 असताना मुलाला थांबवण्याचा आईने प्रयत्न केला.मात्र मुलाने तिच्यावरही हल्ला करून गंभीर जखमी केल्याची संतापजक घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. 

लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय २०) आरोपी मुलाचे नाव असून याला पोलीसांन केली आहे. 

या प्रकरणी शिवनाथचा मामा बाबू दांडेकर (वय ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी शिवनाथ कसलंच काम करत नसल्यामुळे वडिलांनी त्याला काम कर असं सांगितलं होते. काम कर, चांगले रहा, 

असे त्याचे वडील त्याला वारंवार सांगत होते. मात्र, काम न करता मध्यरात्री दीडच्या सुमारास मुलाने गाढ झोपेत असलेल्या वडिलांवर घरातील कात्रीने त्यांच्या छाती आणि पोटावर सपासप वार करत त्यांचा निर्घृण खून करण्यात आला.

 यावेळी आईने मध्यस्ती करत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने आईवरही हल्ला चढवत तिलाही गंभीर जखमी केले. या प्रकरणी मुलाला अटक करण्यात आली असून विश्रांतवाडी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments