google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी ... तलाठ्यांना जिल्ह्यात कोठेही करता येणार काम आस्थापना प्रांतांकडून आली जिल्हाधिकाऱ्यांकडे

Breaking News

मोठी बातमी ... तलाठ्यांना जिल्ह्यात कोठेही करता येणार काम आस्थापना प्रांतांकडून आली जिल्हाधिकाऱ्यांकडे

 मोठी बातमी ... तलाठ्यांना जिल्ह्यात कोठेही करता येणार काम


आस्थापना प्रांतांकडून आली जिल्हाधिकाऱ्यांकडे

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा तलाठ्यांची आस्थापना थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात तलाठ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.

महसूल प्रशासनात २०१३ मध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयाची पुनर्रचना केली होती. उपविभागीय अधिकार क्षेत्रात दोन किंवा तीन तालुक्यांचा समावेश केला होता.तलाठी गट 'क' संवर्गातील

आस्थापना ही उपविभागीय कार्यालय स्तरावरच ठेवली होती. बदली, बिंदू नामावली, आस्थापना विषयक विविध बाबी आदींचे अधिकार

 उपविभागीय स्तरावर म्हणजे प्रांताधिकाऱ्यांनाच होते. तलाठ्यांचे कार्यक्षेत्र एक किंवा दोन तालुक्यांपुरतेच मर्यादित होते. त्यांना सेवा कार्यकाळ याच तालुक्यात पूर्ण करावा लागत होता.

जिल्हाधिकारी करणार तलाठ्यांची बदली

तलाठी गट 'क' संवर्गातील कर्मचारी जिल्ह्यात कोठेही बदलीस पात्र राहणार आहेत. यासाठी महसूल व वन विभागाच्या वतीने नुकताच एक निर्णय घेतला आहे.

 त्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे तलाठ्यांच्या बदल्या आता प्रांताधिकारी नाही, तर जिल्हाधिकारी करणार आहेत.

Post a Comment

0 Comments