मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा निषेध
नोंदवण्यासाठी आज सांगोल्यात रस्ता रोको संबंधितावर तात्काळ कारवाई करावी: सकल मराठा समाज आक्रमक
जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा निषेध म्हणून आज रविवार
दिनांक ३ सप्टेंबर रोजी पंचायत समिती सांगोला येथे सांगोला- पंढरपूर रोड वरती सकाळी ११:०० वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी समाज बांधवांनी सदर आंदोलनात सहभाग नोंदवावा. असे आव्हान सकल मराठा समाज बांधव सांगोला यांच्याकडून करण्यात आले आहे.
मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचे पडसाद संबंध राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये उमटत असताना सांगोला तालुक्यात देखील याचे पडसाद उमटत आहेत.
शनिवारी सकाळी शहरात याचा निषेध नोंदवल्यानंतर रात्री उशिरा सकल मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सदर लाठीचाराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज रविवारी रस्ता रोको आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात सांगोला पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदनाद्वारे कळविण्यात आले असून या रस्ता रोको आंदोलनासाठी सांगोला शहर आणि तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments