दादर- पंढरपूर एक्सप्रेसचा विस्तार सांगोल्यापर्यंत करावा:-
अशोक कामटे संघटना मिरज- कुर्डूवाडी डेमो सोलापूर पर्यंत करा
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)
सांगोल्यातील शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे खालील प्रमाणे निवेदन नुकतेच देण्यात आले.
रेल्वे क्रमांक 11027 &11028 पंढरपूर- दादर -पंढरपूर या रेल्वेचा विस्तार सांगोला किंवा मिरजपर्यंत करावा. व
मिरज -कुर्डूवाडी(51438 & 51437) रेल्वेचा विस्तार सोलापूर पर्यंत करावा , मिरज -सोलापूर -मिरज इंटरसिटी सुरू करा या आग्रही मागण्यांचे निवेदन खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर यांना शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे.
सांगोल्याहून पुणे, मुंबईकडे जाण्याकरिता थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे याबाबतच्या अनेक समस्या प्रवाशांनी कामटे संघटनेकडे व्यक्त केल्या
,अन्य खाजगी बसणे हा प्रवास करावा लागत आहे, सदरचा प्रवास खर्चिक व अधिक वेळ खाऊ तसेच असुरक्षित आहे. रेल्वे प्रशासनाने मिरज -मुंबई किंवा पंढरपूरला आठवड्यातून तीन दिवस चालणारी
दादर -पंढरपूर- पुढे मिरजपर्यंत वाढविल्यास सलगरे, आरग, कवठेमंहाकाळ ,ढालगाव ,जत रोड, सांगोला येथील मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सोय होऊन अल्प वेळेत आपला प्रवास सुरक्षितरित्या पूर्ण करू शकणार आहेत .मिरज -कुर्डूवाडी(51438 & 51437) रेल्वेचा विस्तार सोलापूरपर्यंत करावा
किंवा मिरज -सोलापूर मिरज इंटरसिटी सकाळच्या सत्रात सुरू करणे गरजेचे आहे. ग्रामीण विभागातील प्रवाशांना जिल्ह्याचे मुख्यालय सोलापूर येथे जाण्याकरता सकाळची मिरज- कुर्डूवाडी डेमो सोलापूर पर्यंत सुरू केल्यास प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
तरी या प्रश्न पुढाकार घेऊन अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मुंबई ,सोलापूर रेल्वेचा प्रश्न प्राधान्याने सोडवा अशी येथील प्रवाशांची मागणी आहे.
शहीद कामटे संघटनेने रेल्वेच्या विविध केलेल्या मागण्या रेल्वेमंत्री यांच्याकडे खासदार रणजीतसिंह नाईक -निंबाळकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून नवीन मुंबई गाडीचा प्रश्न मार्गी लावणार आहे
असे चेतनसिंह केदार -सावंत भाजपा जिल्हाध्यक्ष सोलापूर यांनी निवेदन स्वीकारते वेळी शहीद अशोक कामटे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले. सदर निवेदन देतेवेळी अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
सदर निवेदनाच्या प्रती माननीय अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री भारत सरकार ,मा.रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री,
रेल्वे महाव्यवस्थापक ,मुंबई,
विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर,आमदार शहाजीबापू पाटील , चेतनसिंह केदार- सावंत (जिल्हाध्यक्ष -भाजपा सोलापूर) यांनाही देण्यात आले आहे .
0 Comments