शैक्षणिक क्षेत्रात गुंडाराम शिंदे गुरुजींचे योगदान मोठे
-आमदार शहाजीबापू पाटील
नाझरे प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शैक्षणिक क्षेत्रात गुंडाराम शिंदे गुरुजींनी अनेक विद्यार्थी घडविले व आज ते वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून आपल्या कामाचा ठसा उमटवीत आहेत त्यामुळे शिंदे गुरुजींचे योगदान मोठे आहे असे आमदार शहाजी बापू पाटील यांनी गुरुजींच्या 75 वी सोहळा कार्यक्रमात सिद्धनाथ मंगल कार्यालय बलवडी ता सांगोला येथे मत व्यक्त केले
तसेच यापुढेही गुरुजींनी शैक्षणिक क्षेत्रासाठी मार्गदर्शन करावे व सांगोला तालुक्याच्या विकासासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून यापुढेही आणून विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी यावेळी दिली
सदर प्रसंगी पुरोगामी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख माजी सरपंच विजय दादा शिंदे बाळासो शिंदे प्रसाद शिंदे डॉ शिवाजीराव ढोबळे सोसायटी चेअरमन शिवाजी शिंदे
शिक्षक नेते रमेश शिंदे शिवसेना नेते साहेबराव शिंदे ग्रामपंचायत सदस्य रविराज शिंदे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संदीप खुळपे चांगदेव तात्या शिंदे विकास पवार
माजी सरपंच विनायक मिसाळ सरपंच नाथा खंडागळे रामचंद्र केंगार आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके पत्रकार रविराज शेटे शिवाजी शिंदे ज्ञानेश्वर मिसाळ गुरुजी शिंदे गुरुजी शिंदे यांचे जावई प्रा रघुनाथ जाधव
सौ सारिका जाधव विजयकुमार शिंदे राजकुमार शिंदे सौ पुष्पा शिंदे सौ साधना शिंदे परिवार ग्रामस्थ शिक्षक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक मनोहर पवार यांनी मानले.
0 Comments