सांगोला तालुक्यातील धक्कादायक घटना...
एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून दोन सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने हल्ला
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : म्हणत भावकीतील एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून कु-हाडीने डोक्यात व डाव्या कानावर मारून सख्ख्या भावास गंभीर जखमी केले तर इतरांनी दगड व काठीने केलेल्या मारहाणीत दोन भावांसह दोन महिला गंभीर जखमी झाल्या.
सांगोला तालुक्यात चिणके येथे ही घटना घडली. याबाबत महादेव जगन्नाथ मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सिद्धेश्वर मिसाळ, शारदा मिसाळ, संस्कार मिसाळ, साहिल मिसाळ (सर्वजण रा. चिणके) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महादेव मिसाळ व सिद्धेश्वर मिसाळ दोघेजण भाऊ सामाईक जागेत शेजाशेजारी राहतात. दोघांत शेतीचा जुना वाद आहे. फिर्यादीची भावजय शारदा हिने नातू श्रीनाथने अंघोळ करताना शर्टाची कॉलर उडवली म्हणून शिवीगाळ करू लागली होती.
तुम्हाला लय माज आला आहे. तुम्ही आमच्या नादी लागता काय, असे म्हणून हातात काठ्या व कुऱ्हाड घेऊन बाहेर आले व भाऊ सिद्धेश्वर याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने महादेव याच्या डोकीत व डाव्या
कानावर मारून जखमी केले. सिद्धेश्वर, मुलगा गणेश यांच्या डोकीत तर पुतण्या साहिलने काठीने दुसरा मुलगा विठ्ठल यास डोकीत मारुन जखमी केले.
0 Comments