google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कमलापूर ते अजनाळे रस्ता बनला मृत्यूचा सापळा वारंवार पाठपुरावा करून देखील रस्ता झाला जलमय व खड्डेमय

Breaking News

सांगोला तालुक्यातील कमलापूर ते अजनाळे रस्ता बनला मृत्यूचा सापळा वारंवार पाठपुरावा करून देखील रस्ता झाला जलमय व खड्डेमय

 सांगोला तालुक्यातील कमलापूर ते अजनाळे रस्ता बनला मृत्यूचा सापळा


वारंवार पाठपुरावा करून देखील रस्ता झाला जलमय व खड्डेमय

सांगोला / शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज: सांगोला तालुक्यातील नजीकचे गाव असलेले कमलापूर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढल्यामुळे तसेच प्रवाशांची रीघ जास्त वाढल्यामुळे कमलापूर अजनाळे रस्ता अक्षरशः गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये खड्डेमय व जलमय झालेला आहे. 

कमलापूर गाव रहदारीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे गाव असून या गावावरून ये जा करण्यासाठी दिघंची, आटपाडी, बोबेवाडी, पिंपरी, खवासपूर, लोटेवाडी, बागलवाडी, लिगाडेवाडी, अजनाळे, चिणके, नाझरे, वझरे, य. मंगेवाडी अशी एक ना अनेक गावातील लोक या 

रस्त्यावरून रात्री अप रात्री केव्हाही ये जा करत असतात. व्यापाराच्या दृष्टीने वरील सर्व गावे प्रगतीपथावर आहेत शेती क्षेत्राची मोठी ओलाढाल वरील सर्व गावांमध्ये व्यापारी व नगदी पिके घेतली जातात गेली साडेचार होऊन वर्षे होऊन गेले तरीसुद्धा कमलापूर गावाहून इतर गावांना जाण्यासाठी

 ओबडधोबड आकाराचा भली मोठी खड्डे पडलेले, आकट्या पडलेले, रस्ते झाल्यानंतर रस्ता आहे की डब्बा आहे हे दिसत नाही. त्यामुळे अनेक लोकांचा कमलापूरच्या जवळ यल्लमा देवी मंदिर परिसर ते ढोले वस्तीपर्यंत जवळपास सव्वा किलोमीटरचा रस्ता

 अक्षरशः खड्डेमय वपावसाळ्यामध्ये ज्येष्ठ मंडळी शाळेतील विद्यार्थी महिला भगिनी जीव मुठीत घेऊन अक्षरशः भीती नाही वातावरणात प्रवास करतात. त्या दोन अडीच वर्षांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्यमान लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी,

 अशा सर्व लोकांना निवेदने व पत्रव्यवहार करून देखील हा रस्ता दुरुस्ती होत नाही यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या बाबतीत मोठी नाराजी निर्माण झाली आहे. जवळजवळ अनेक लोक त्यावरून प्रवास करताना अक्षरशः हातपाय मोडलेले आहेत. काही जणांना कायमचे अपंगत्व आलेले आहे.

काही लोकांच्या टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. भारत देश हा महासत्ता आणण्याचे स्वप्नं पहात असताना एखांदा रस्ता पर पाठपुरावा करून देखील दुरुस्ती होत नसेल तर मोठी लाजिरवाणी व अधोगतीची लक्षण आहोत. 

तरी कमलापूर, अजनाळे, चिणके, यलमार मंगेवाडी व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने सदरचा रस्ता लवकरात लवकर कायमस्वरूपी निकाली काढावा. अन्यथा उग्र स्वरूपात आंदोलन केले जाईल. इशारा अनेक ग्रामस्थांनी दिलेला आहे.

Post a Comment

0 Comments