google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात ..... चालकासह अन्य तीन जीव गेले !

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात ..... चालकासह अन्य तीन जीव गेले !

सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात ..... चालकासह अन्य तीन जीव गेले !


 सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी - टेंभुर्णी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात, चालकासह अन्य तीन जीव देखील गेले असून दोघे जण जखमी झाले आहेत. आज सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

माढा तालुक्यातील कुर्डू येथे कुर्डूवाडी टेंभुर्णी रस्त्यावर महिंद्रा पिकअप व लक्झरी बसच्या यांच्यात हा अपघात झाला. या अपघातात पिकअप चालकाचा जागेवरच मृत्यू ओढवला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.  मयत पिकअप चालक शफिक कुरेशी ( वय ३५) हा माढा तालुक्यातील पापणस येथील असून

 लक्झरी बस चालक देविदास तुळशीराम मुत्तलवाड (३० मुखेड), प्रवासी असलेला बसवंत रामराव वाघमारे (बिरवली, लातूर) हे जखमी झाले आहेत, यासह तीन जनावरांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. 

 यातील हकीगत अशी की, एक महिंद्रा पिकअप ( एम एच २० डी ई २०९२) म्हशी घेवून अकलूजला निघाला होता. या वाहनात एकूण पाच म्हशी होत्या. हे वाहन कुर्डू हद्दीतील चोपडी वस्ती येथे आलेला असताना समोरून आलेल्या लक्झरी बसशी जोरदार धडक झाली आणि हा अपघात झाला.

समोरासमोरून वेगात येत असलेली ही दोन  वाहने परस्परांना जोरदार धडकली. त्यामुळे जोराचा मार लागलेला पिकअपचालक जागीच ठार झाला. या अपघाताची भीषणता एवढी होती की, पिकअप आणि लक्झरी बस या वाहनांचे चालकाचे केबिन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.  

लक्झरी बस चालकाला देखील  प्रचंड मार लागला आहे.  जखमींना तातडीने सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पिकअप वाहनात असलेल्या पाच म्हशीपैकी तीन म्हशी देखील मृत्युमुखी पडल्या आहेत.

Post a Comment

0 Comments