धक्कादायक ..आईला पोटचा गोळाच विकायचा होता, महिलेसह तिघांना अटक; सोलापुरातील घटना
अकरा महिन्यांच्या बाळाच्या अपहरण प्रकरणातील आरोपी महिला पैशासाठी स्वतःचे बाळ विकणार होती; पण बाळाला सर्पदंश झाल्याने ते विकण्यात अडचण आली. बाळावरील उपचार व घरखर्चासाठी पैशाचा मेळ लागेना, तेव्हा पैशांसाठी तिने एका बाळाचे अपहरण करून ते विकले.
पोलिसांनी पाच महिने तपास करून त्या चोरलेल्या बाळाला आईकडे सुपूर्द केले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करीत अटक केली.वंदना मनसावाले, लक्ष्मी सामलेटी, लता चंद्रभानू येलगम व चंद्रभानू येलगम (सर्व रा. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मीरा गोटीवाले या लोधी गल्लीतील रहिवासी आहेत. 3 मे 2023 ला सामूहिक विवाह सोहळ्यात गोटीवाले यांचा अकरा महिन्यांचा मुलगा गायब झाला होता. लग्न सोहळ्यात नातेवाईकांकडे विचारणा केली; पण बाळ सापडेना.
त्यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक सचिन माळी यांच्या पथकाने बाळाचा शोध सुरू केला. पोलिसांनी व्हॉट्सऍपवर बाळाचा फोटो आणि संपर्क नंबरची पोस्ट व्हायरल केली.
मीरा गोटीवाले यांनी त्यांच्या मोबाईलवरही बाळाचे स्टेट्स ठेवले होते. विडी घरकुलात राहणाऱ्या त्यांच्या एका नातेवाईक महिलेने ते स्टेट्स पाहिले. त्यांनी ते बाळ आरोपी लता येलगम हिच्याकडे असल्याचे फोटोकरून तिच्या लक्षात आले. दरम्यान, त्यांनी लता येलगमकडे विचारणा केली
तेव्हा त्यांनी हे बाळ दत्तक घेतल्याचे सांगितले. तेक्हा त्यांनी हा प्रकार मीरा गोटीकाले यांना सांगितला. पोलिसांनी तत्काळ हालचाल करीत बाळास ताब्यात घेत तब्बल पाच महिन्यांनी आई मीरा गोटीवाले यांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी चौकशी केली असता लता येलगम हिने बाळ दत्तक घेण्याचा प्रयत्न चालकिला होता. लक्ष्मी सामलेटीच्या माध्यमातून तिने वंदना मनसावाले हिचे बाळ विकत घेण्याचे ठरविले होते. वंदना ही गर्भवती असताना बाळ जन्मल्यानंतर घेण्याचा सौदा ठरला.
वंदना हिला अपत्य झाल्यानंतर या अपत्याला सर्पदंश झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे वंदना हिने स्वत:च्या बाळाचा उपचाराचा खर्च भागवण्यासाठी बाळ चोरून आणून देण्याचा प्रकार केल्याचे सांगितले.
0 Comments