धक्कादायक घटना! आजाराला कंटाळून गळफास घेत शेतकऱ्याने केली आत्महत्या;
मंगळवेढा तालुक्यातील घटना
मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील शेतकरी सत्यवान व्यंकट पाटील (वय ६५) यांनी स्वतःच्या आजाराला कंटाळून खोली मधील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली असून या घटनेची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.
या घटनेची हकीकत अशी, दि.१३ रोजी सकाळी ११ पुर्वी यातील मयत सत्यवान पाटील यांनी घराशेजारी असलेल्या पिठाच्या गिरणी खोलीत लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे उमेश पाटील यांनी दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे.
मयत सत्यवान यांची तीन वर्षापुर्वी बायपास सर्जरी झाली होती. तसेच ते संधीवाताने त्रस्त होते. यातील मयताचा मुलगा मनोज पाटील याने फोन करुन खबर देणारे यास वडिलांनी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सांगून उमेश यास लवकर ये म्हणाले.
त्यावेळी घटनास्थळी तात्काळ येवून पाहिले असता गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना देवून खबर देण्यास पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले. मयत सत्यवान पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.


0 Comments