बाबो..! सांगोला तालुक्यातील या गावात सरपंचाच्या
शेतातील लोखंडी जाळी कुंपणाच्या तारा कट करून १६ शेळ्या-बोकडांची चोरी -
सांगोला:- सरपंचाच्या शेतातील लोखंडी जाळी कुंपणाच्या तारा कट करून १० शेळ्या व ६ बोकड असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
ही घटना काल मंगळवार, सकाळी ६ वाजतापूर्वी लोटेवाडी, ता.सांगोला येथील सातारकर वस्ती येथे घडली.
याबाबत सरपंच विजयकुमार उत्तमराव खांडेकर (रा.सातारकरवस्ती, लोटेवाडी) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सरपंच विजयकुमार खांडेकर यांनी शेतीला पूरक व्यवसाय खिलार गाई-म्हशींसह एकूण लहान-मोठ्या २६ शेळ्या पाळल्या आहेत.
त्यांनी घरापासून सुमारे ४ किमी अंतरावर शेतामध्ये जनावरांच्या गोठ्यासह शेळ्यांना बंदिस्त करण्यासाठी लोखंडी तार जाळीचे कुंपण उभे केले होते.
दरम्यान, सोमवार ११ रोजी रात्री १०:३०च्या सुमारास त्यांनी २६ लहान- मोठ्या शेळ्यांसह बोकड कुंपण जाळीमध्ये बंदिस्त करून ते घराकडे परतले होते.
मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास नेहमीप्रमाणे ते शेतात गेले असता कुंपणामध्ये २६ शेळ्यांपैकी १६ शेळ्या व बोकड कमी असल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी सालगडी रवी खंडावते असे मिळून सदर शेळ्यांचा शेतात आजूबाजूला शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत.


0 Comments