google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी अजनाळे गावातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन केली पिकांची पाहणी…

Breaking News

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी अजनाळे गावातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन केली पिकांची पाहणी…

 प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे


यांनी अजनाळे गावातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन केली पिकांची पाहणी…
       
                               

अजनाळे प्रतिनिधी –(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष ९५०३४८७८१२)

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हंगामी पिक प्रतिकुल परिस्थितीत या घटकासाठी सांगोला तालुक्यासाठी विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी

 तालुक्यातील जवळपास 39 हजार हेक्टर क्षेत्रावर पीक विमा उतरवला आहे यामध्ये जवळपास 61 हजार शेतकरी सहभागी झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.

काल बुधवार दि २७ सप्टेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे व पिक विमा चे प्रतिनिधी यांनी अजनाळे गावातील हणमंत खंडागळे, बाळू मुलाणी या शेतकऱ्यांच्या थेट 

 बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक मधुकर चव्हाण, कृषी सहाय्यक विवेक पाटील,शेतकरी कैलास कुरे, हणमंत खंडागळे यांच्यासह अन्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

पुढे बोलताना तालुका कृषी अधिकारी शिंदे म्हणाले की, हंगामी प्रतिकूल परिस्थिती या घटकांतर्गत पावसाचा सलग तीन ते चार आठवडे खंड न पडता अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान ५० टक्के येत असेल तर हंगामी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वेक्षण केले जा

ते त्या आधारे शेतकऱ्यांना 25% वर्ग करण्याची तरतूद केली जाते यामध्ये सांगोला तालुक्यातील पाच मंडल मधील सलग तीन ते चार आठवडे पावसाचा खंड होता

 जिल्हाधिकारी यांनी  आदेश  काढला होता त्याची अंमलबजावणी करून सर्वेक्षण करण्यात आले होते त्या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा स्तरावर सादर करण्यात आला होता

 त्याची अधिसूचना जिल्हास्तरावरून निघाली आहे आपल्या तालुक्यातील १० मंडल पैकी ५ मंडल वर सलग तीन ते चार आठवडे खंड नव्हता सांगोला, संगेवाडी, सोनंद, नाझरा,हातिद या पाच

  मंडल मधील सर्वे करण्याचे काम कृषी विभागाकडून अपूर्ण राहिले होते जिल्हाधिकारी यांनी विशेष बाब म्हणून सर्वेक्षण करण्याचे कृषी विभागाला आदेश दिले होते. कृषी विभाग व पिक विमा यांच्याकडून बाजरी कापूस या पिकाचे. 

सर्वेक्षण करून दोन दिवसात जिल्हास्तरावर सादर करण्यात येईल असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.या वेळी शेतकरी महादेव भंडगे,नागनाथ भंडगे, बबन कुरे,हणमंत खंडागळे, बाळु मुलाणी यांच्यासह अन्य शेतकरी बांधव  यांच्या बांधावर जाऊन बाजरी पिकांची पाहणी करण्यात आली.फोटो

Post a Comment

0 Comments