कोळे येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 232 वी जयंती उत्साहात साजरी...
कोळे / वार्ताहर ( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)
उमाजीराजे नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव दादोजी खोमणे व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांना वडिलांकडून हेरगिरी व युद्धाचे शिक्षण मिळाले. याकाळात इंग्रजांनी पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास गादीवर बसवले. इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले.
करारी उमाजीराजे यांनी जेजुरीच्या खंडेरायासमोर इंग्रजांविरुद्ध उठावाची गर्जना केली. भारताच्या स्वतंत्र करिता प्रथम सशस्त्र क्रांतीचे स्वप्न पाहणारे अश्या या आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 232 वी जयंती कोळे ता.सांगोला या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी अध्यक्ष सोमनाथ (बैजू) मोहिते,सोन्या माने,संग्राम मोहिते,दिनेश मोहिते,आणा चव्हाण, तुषार माने,विश्वजित हातेकर,आकाश हातेकर,हरीश मोहिते,यश मोहिते,अजित हातेकर,अभिषेक हातेकर, विनोद चव्हाण, प्रसाद आइवळे, व संपूर्ण समोशी समाज व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments