सोलापूर प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने (PB ग्रुप)सामुदायिक रक्षाबंधन
महासोहळा हजारो विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांच्या सहभागामध्ये संपन्न.
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)
सोलापूर - मंगळवार दिनांक २९/०८/२०२३ रोजी सकाळी १० वाजता प्रबुद्ध भारत चौक, बुधवार पेठ, मिलिंद नगर, सोलापूर येथे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप) चे प्रमुख मार्गदर्शक तथा सो.म.पा. मा. गटनेते आनंद (दादा) चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक रक्षाबंधन महासोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाद्वारे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यामध्ये स्नेहबंधन वाढवणे व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात घेऊन सामुदायिक रक्षाबंधन महासोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी हा उपक्रम मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उपक्रमात रावजी सखाराम हायस्कूल, उमाबाई श्राविका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बी.एफ. दमानी प्रशाला, एस. आर. चंडक इंग्लिश मीडियम हायस्कूल,
गांधी नाथा इंग्लिश मीडियम हायस्कूल, म.न.पा. शाळा क्रमांक २, ११, १६, २७, महेश इंग्लिश मीडियम हायस्कूल. रा.स. चंडक हायस्कूल व श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला इत्यादी शालेय महाविद्यालयीन हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी या सामुदायिक रक्षाबंधन महासोहळ्यास सहभागी होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. संदिप कारंजे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. सिद साहेब,
इथोस रिअल इस्टेटच्या संचालिका मा.अंजलीताई वाघमारे, सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्यअधिकारी मा. बसवराज लोहारे सो.म. पा. विभागीय कार्यालय क्रमांक १ चे विभागीय अधिकारी मा.जगधाने इत्यादी प्रमुख मान्यवरांची यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे मा. गटनेते तथा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद ( दादा) चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विविध शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना एकत्र करून
सामुदायिक रक्षाबंधन महासोहळा हा उपक्रम गेले १७ वर्षापासून(पी.बी. ग्रुप)च्या माध्यमातून करण्यात येत आहे. सोलापूर शहरांमध्ये बुधवार पेठ हा परिसर मोठा भाग असून बुधवार पेठ परिसरामध्ये विविध नामांकित शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहेत.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शालेय व महाविद्यालय विद्यार्थी व विद्यार्थिनी मध्ये स्नेहबंधन वाढवणे व मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता लक्षात घेऊन सामुदायिक रक्षाबंधन महासोळ्याचे आयोजन करण्यात आला आहे.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा.संदीप कारंजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की बुधवार पेठ परिसरामध्ये १७ ते १८शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यामध्ये एक सामांजस्य वातावरण असावे बंधुभाव असावा आणि विद्यार्थिनींना व महिला भगिनींना सुरक्षितता जाणवावी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा हा उपक्रम गेल्या १७ वर्षापासून चालू आहे
हा खरोखर उपक्रम अत्यंत चांगले आहे आणि अशा उपक्रमामुळे सामाजिक सलोखा आणि संदेश या माध्यमातुन या प्रबुद्ध भारत तरुण मंडळाने आपल्या शहराला दिला आहे या मंडळाचा मी कौतुक करतो आणि आज या दिवशी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा
संविधानाचा मसुदा तयार करण्याचा अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. अशाप्रकारे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा कार्यक्रम व डॉ.बाबासाहेबांनी जे काही संदेश दिले आहेत, जे काही आठवणी दिलेले आहेत त्यांचा सर्वांनी अनुकरण करावे . सर्वांना रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.
यावेळी मंचावर सोलापूर महानगरपालिकेचे मा. नगरसेवक गणेश पुजारी, उमाबाई श्राविका प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य मोहाळे सर,पी .बी .ग्रुपचे अध्यक्ष अमित बनसोडे, कार्याध्यक्ष आदित्य चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत (आप्पा)जाधव,
सामाजिक कार्यकर्ते अविनाश भडकुंबे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोनवणे, गोपीनाथ जाधव,सोलापूर महानगरपालिकेचे विभागीय कार्यालय क्रमांक १ चे मुख्य आरोग्य निरीक्षक मा.लोखंडे , आरोग्य निरीक्षक बच्चू , निरीक्षक विजय साळुंखे,
आरोग्य निरीक्षक जितेंद्र मोरे ,आरोग्य निरीक्षक राहुल गदवालकर, आरोग्य निरीक्षक बद्दूरकर, आरोग्य निरीक्षक सातपुते ,आरोग्य निरीक्षक राठोड, उमाबाई श्राविका प्रशाला सुहास चंचुरे सर गांधीनाथा इंग्लिश मीडियम हायस्कूल अमोल कांबळे सर, मनपा शाळा क्रमांक २७ जगताप सर, तळेकर सर, डी वाय बिराजदार सर,सुनील गायकवाड सर, प्रमोद कुलकर्णी सर ,
महेश जवंजाळ सर, गणेश लेंगरे सर,अविनाश मूलदूतकर सर, मेहरून शेख मॅडम,वंदना हिलवाले मॅडम, इंगोले मॅडम, दिघे सर, कल्याणआप्पा हायगुंडे सर,सोमनाथ राऊत सर, सिकंदर शेख, जयराज सांगे भीमराज मस्के गौतम शिंदे, महेश शिंदे, रोहित वाघमारे, राहुल बागले, रोहन तळभंडारे इत्यादी उपस्थित होते.
0 Comments