सांगोला नगरपालिकेमधील अधिकार्यांना येथील ठेकेदार झाले वरचढ सध्या
सांगोला नगरपरिषदेवर कोणाचे नियंत्रण? प्रशासनाचे की मुजोर ठेकेदारांचे?
सांगोला/प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
सांगोला नगरपरिषदेमध्ये लोकप्रतिनिधी यांचा कालावधी संपल्यामुळे सध्या नगरपरिषदेवर प्रशासन म्हणून तहसीलदार व सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे नगर परिषदेच्या सर्व कारभार सोपविण्यात आलेला आहे
मात्र या अधिकार्यांचे सांगोला नगर परिषदेमधील असणार्या अधिकारी, कर्मचारी व येथील ठेकेदार यांच्यावर अंकुश नसल्यामुळे या सांगोला नगरपरिषदेमध्ये येथे सर्वजणच आपल्या मनमर्जीपमाणे प्रमाणे वागत असल्याचे सध्या चित्र पहावयास मिळत आहे.
या नगरपरिषदेमधून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार वाढल्याचे सांगोला शहरवासियांमधून बोलले जात आहे. या गैरप्रकाराचा विरोधात कोणी आवाज उठवित असेल व काही नगरपरिषदेमधील कागदपत्रांची रितसर मागणी करीत असेल तर त्याला येथील अधिकारी हे प्रशासकीय कामकाजाचे कागदपत्रे तुम्हाला देता येत नसल्याचे स्पष्टपणे बोलून दाखवित आहेत.
मात्र याबाबत त्याप्रमाणात लेखी स्वरूपाचे म्हणणे देण्यास मात्र टाळाटाळ करीत आहे. सांगोला शहरामध्ये गेल्या महिण्याभरापूर्वी विनाकारण सांगोला शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये डांबरी रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी चक्क दगडाचा मुरूमाचा वापर केला होता.
याबाबत माहितीच्या अधिकारामध्ये याबाबत सविस्तर माहिती मागितली असता संबंधित अधिकारी ते देण्यास चालढकलपणा करीत आहे. या दगडाच्या मुरूम पूर्ण सांगोला शहरातील बाजारपेठेमध्ये पसरला गेला
असल्यामुळे या मुरूमाच्या दगडावरून गाड्यांचे तोड जावून अपघात होताना दिसत आहे. व या गाड्यांच्या ये-जा मुळे मोठ्या प्रमाणात मातीमिश्रीत धुळीचे साम्राज्य संपूर्ण सांगोला शहरात झाल्याचे दिसत आहे. परंतु सांगोला शहरामध्ये ज्या ठिकाणी मातीचे रस्ते होते व त्या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे खड्डे निर्माण झाले आहे.
त्या ठिकाणी मात्र हे सांगोला नगरपरिषदेचे अधिकारी मुरूम टाकण्यास दिरंगाई करीत आहे. अधिकार्यांना या मुरूमाचे टेंडर घेतलेल्या ठेकेदार हा अर्वाच्च भाषेमध्ये मी एक दोन मुरूमांच्या खेपा टाकणार नाही मला ते परवडत नाही असे अधिकार्यांना दमदाटीमध्ये बोलत
असल्याचे येथील संबंधित अधिकार्यांकडून मागणी केलेल्या अर्जदाराला सांगण्यात आले. अश्या या दमदाटीमध्ये बोलत असलेल्या ठेेकेदाराला सांगोला नगरपरिषदेमधील अधिकारी टेंडर कसे देतात व दिले तरी या ठेकेदाराची अधिकार्यांना ही भाषा करण्याची धमक येते तरी कुठून व यावर येथील अधिकारी गप्प का?
यामुळे या ठेकेदार व येथील संबंधित अधिकार्यांमध्ये जणू काही टक्केवारीचे लागेबंधे तर नाही ना? अशी चर्चा संपूर्ण सांगोला शहरवासियांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिली जावू लागली आहे. तरी सांगोला नगरपरिषदेमध्ये प्रशासनाची नेमणुक झाल्यापासून कोणकोणती कामे झाली आहेत.
व ती कोणत्या मार्गाने व त्या कामाचा दर्जा तपासण्याची आवश्यकता असल्याचे सांगोला येथील सुज्ञ नागरीकांना मागणी होवू लागली आहे. तरी या गंभीर घटनेची दखल घेत लोकप्रतिनिधींनी व वरीष्ठ अधिकार्यांची याची सखोल चौकशी करावी अशा आशयाचे लेखी पत्र
मा. मुख्यमंत्री साो महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर , प्रांतधिकारी कार्यालय मंगळवेढा, तहसिलदार कार्यालय सांगोला, मुख्याधिकारी साो सांगोला नगरपरिषद सांगोला यांना पाठविण्यात येणार काही समाजसेवकांकडून असल्याचे सांगण्यात येत आहे.


0 Comments