google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भयंकर घटना..आधी कोयत्याने बायकोला संपवलं, नंतर चिमुकल्याचा जीव घेतला, दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला

Breaking News

भयंकर घटना..आधी कोयत्याने बायकोला संपवलं, नंतर चिमुकल्याचा जीव घेतला, दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला

भयंकर घटना..आधी कोयत्याने बायकोला संपवलं,


नंतर चिमुकल्याचा जीव घेतला, दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला

रत्नागिरी जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडाने लांजा तालुका हादरला आहे. पत्नी व सहा वर्षांचा चिमुकल्याची हत्या पतीनेच केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघड झाला.

 या हत्याकांडा प्रकरणी संदेश रघुनाथ चांदिवडे (संशयित) रा. कोट पाष्टेवाडी, ता. लांजा या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश याने पत्नी सोनाली (२६) हिची हत्या कोयत्याचे वार करून केली, 

तर प्रणव (६) या स्वतःच्या मुलाची हत्या गळा दाबून केली आहे. या घटनेचे माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तत्काळ फरार आरोपीच्या शोधार्थ पोलिसांच्या तीन पथकांची नेमणूक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, संदेशने अज्ञात कारणावरून आपली पत्नी सोनालीची आणि मुलगा प्रणव यांची निर्घृण हत्या केली. चिमुकल्या प्रणवची हत्या गळा आवळून किंवा नाक तोंड दाबून ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. संदेशविरुद्ध पोलीस पाटलांनी फिर्याद दिली आहे. 

फिर्यादीवरून या दुहेरी हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. संशयित फरार आरोपी संदेश चांदिवडे हा वीजबिलांच्या मीटरचे रीडिंग घेण्याचे काम करत असे.

पत्नी आणि मुलाला ठार मारून संशयित आरोपी संदेश चांदिवडे हा फरार झाला होता. त्याचा लांजा पोलीस कसून तपास करत होते. काही पोलीस पथके तपास करत असताना त्यांच्याच घरामागील एका सड्यावर लपून बसलेल्या संदेशला अखेर पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments