google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भयानक प्रकार! एनसीसी ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

Breaking News

भयानक प्रकार! एनसीसी ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

 भयानक प्रकार! एनसीसी ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण


ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्ध्यांना युनिट हेड विद्यार्थ्यानेच अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. 

या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गात खळबळ उडाली आहे.

ठाणे पश्चिमेकडील, चेंदणी कोळीवाडा येथील सिडको बस थांब्यानजीक के.जी.जोशी बेडेकर कॉलेज असुन येथे के. जी. जोशी – बेडेकर कला शाखा, बांदोडकर विज्ञान शाखा, टीएमसी लॉ कॉलेज आणि डॉ. बेडेकर पॉलिटेक्निक हे विभाग आहेत.

 येथील विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्व धडे देण्यात येतात. याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास शिक्षा केली जाते.

 पण व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून शिक्षा की मारहाण असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एका महाविद्यालयाच्या मैदानात पावसामुळे तुंबलेल्या पाण्यात विद्यार्थी कसरत करीत असताना एक युनिट हेड त्या विद्यार्थ्याना बेदम मारहाण करीत आहे.

 ती मारहाण अतिशय भयानक होती. दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली आहे. मात्र या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचं जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी खडसावून सांगितले आहे.

एनसीसीचे प्रशिक्षक हे सिनियर विद्यार्थीच असतात. ते शिक्षक नसतात. मात्र, हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. या प्रकारामुळे एनसीसीकडून केली जाणारी चांगली कामे लपली गेली आहेत. संबंधित विद्यार्थ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. असेही नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments