google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान लवकरच राबविणार...

Breaking News

मोठी बातमी.. राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान लवकरच राबविणार...

मोठी बातमी.. राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान लवकरच राबविणार...


सोलापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राज्यात मागील तीन-चार महिन्यापासून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे इतर मद्याच्या विक्रीत चांगली वाढ झालेली आहे.

 तरी राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून या अभियानात सहभागी होणाऱ्या गावांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित पुणे विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत श्री देसाई मार्गदर्शन करत होते.

 यावेळी उत्पादन शुल्क पुणे विभागाचे उपायुक्त मोहन वर्दे, राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक चरणजीत राजपूत (पुणे), प्रमोद सोनोने(नगर), नितीन धार्मिक (सोलापूर) यांच्यासह विभागातील उप अधीक्षक ही उपस्थित होते.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले की. पुणे विभागातील उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी विभागातील सर्व 

गावांमध्ये हातभट्टी निर्मिती नष्ट करण्यासाठी काटेकोरपणे कारवाई करावी. शासन लवकरच हातभट्टी मुक्त गाव अभियान धोरण आणणार असून त्या अनुषंगाने

 एकाही गावात हातभट्टीची निर्मिती होणार नाही याची दक्षता घ्यावी. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी गावातील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले.

Post a Comment

0 Comments