वामनराव शिंदे साहेब विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात
गुरूंना अग्रस्थानी ठेवून आपले कार्य व शिक्षण सुरू ठेवावे:- रमेश पवार
सांगोला( प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात व्यास गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरुवातीस सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन संस्थाअध्यक्षा. श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून करण्यात आले .प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना संस्थेच्यावतीने श्रीफळ देऊन
गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मानित करण्यात आले .यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ सहशिक्षिका सुवर्णाताई इंगवले मॅडम यांनी गुरु पौर्णिमेची महती विद्यार्थ्यांना सांगितली
त्याचबरोबर गुरुजणांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगितले प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात गुरूंना अग्रस्थानी ठेवून आपले कार्य व शिक्षण सुरू ठेवण्यास गरजेचे असल्याचे सांगितले ,
प्रत्येकाला आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर अडचणींच्या वेळी योग्य मार्गदर्शन करायला चांगल्या गुरुची गरज भासतेस गुरू नुसते शिकवीत नाहीत तर आपले आयुष्य घडवतात .
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना नेहमी अग्रस्थानी ठेवून त्यांना गुरूच्या रूपात दृष्टिकोन ठेवण्याची मार्गदर्शन मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी केले.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष कुंभार सर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .


0 Comments