सांगोला शहरात विनाकारण विद्यार्थींनीची छेडछाड काढल्याने,रोड रोमिओना ,पोलीसांनी दिला चोप
शाळा महाविद्यालय बसस्थानक परिसरात विनाकारण मोकाट फिरताना आढळून आल्यास रोड रोमिओंवर कारवाई करणार - स.पो. नि. हेमंत काटकर
सांगोला शहरातील शाळा महाविद्यालयाच्या शालेय वेळेत व बसस्थानक परिसरात दुचाकी व चारचाकीतून विनाकारण मोकाट
रोडरोमिओगिरी करणाऱ्या रोड रोमिओना गस्तीवरील पोलिसांनी पकडून चांगलाच चोप दिला. यापुढे शाळा भरतेवेळी व सुटल्यानंतर वरील परिसरात पोलिसांचा वॉच असणार आहे.
शाळाबाह्य तरुणांकडून छेडछाड होत असल्यास विद्यार्थ्यांनीनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर यांनी केले.
सांगोला शहरातील शाळा महाविद्यालये परिसरासह एसटी बस स्थानकावर शाळा सुटल्यानंतर मोकाट तरुणांकडून मुलींची छेडछाड होत
असल्याबाबत पालकांच्या तक्रारी सांगोला पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत काटकर यांनी
पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सोमवार १० जुलै रोजी शाळा महाविद्यालयासह बस स्थानक परिसरामध्ये पेट्रोलिंग केले
यावेळी काही रोडरोमिओ दुचाकी, चार चाकी वाहनातून वरील परिसरात मोकाट फिरताना मिळून आले
पोलिसांनी रोड रोमिओची धरपकड करून ताब्यात घेतले त्यांना चोप देवून काही काळासाठी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले व यापुढे शाळा महाविद्यालय बस स्थानक परिसरात रोमिओगिरी करताना आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल
असे सुनावले. शहरातील शाळा, कॉलेज सुटल्यानंतर पोलिसांची गस्त यापुढे सुरू राहणार आहे. एसटी बस स्थानकावर देखील पोलिसांचा वाॅच असणार आहे.
रोडरोमिओ कडून मुलींची छेड काढण्याचा प्रकार घडल्यास शालेय विद्यार्थिनीनी तात्काळ सांगोला पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन सहा. पोलीस निरीक्षक हेमंत काटकर यांनी केले आहे.


0 Comments