सोलापुरात भाजप, शिंदे गटाला खिंडार;
शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेससह भाजप- शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला आहे.
सोलापूर जिह्यातील या पदाधिकाऱ्यांचे बुधवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात स्वागत करण्यात आले.
शिंदे गटातील उपजिल्हाप्रमुख दीपक खंडागळे, शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांचे निकटवर्तीय आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील,
भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती सदस्य आणि सरचिटणीस दत्तात्रय मुंडे, भाजपाचे गोरख पवार, माळशिरस मधील भाजपाचे पदाधिकारी भाऊ मगर, सचिन कदम, नागनाथ मगर, दत्ताजी बोडरे,
पृथ्वीराज मगर, यश धोत्रे, शैलेश पवार त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे सरपंच कृष्णा बेहेरे, सदस्य अनिल बेहेरे, बाबा आईवळे आणि भाजपमधील अनेक पदाधिकाऱयांनी शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेना सचिव- खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवासेनेचे गणेश इंगळे, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, संतोष राऊत,
शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, उपतालुकाप्रमुख भारत मोरे, तुषार इंगळे, असलम मुलानी, गणेश कांबळे, महादेव बंडगर, अशोक देशमुख, डॉ. निलेश कांबळे, अवधूत कुलकर्णी त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


0 Comments