सावधान शिक्षकांनो! शाळेत तंबाखू, मावा खाल्ल्यास होणार निलंबन;
मोबाइल वापरण्यावरही बंदी; सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ स्वामींचा आदेश
शाळा व परिसरात तंबाखू, मावा, सिगारेट, विडीसारखे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास बंदी आहे.
शिक्षकांनी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
तीन वेळेस असा प्रकार केल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. असा आदेश सीईओ दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद शाळेतील बरेचशिक्षक शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत.
त्यामुळे केंद्रप्रमुखांना परिपत्रक काढून सक्त आदेश दिले आहेत.
आदेशाचे पालन न केल्यास २०० रुपये दंड करण्यात येईल. दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार हे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांना दिले आहेत.
शिक्षक शाळेच्या वेळेत मोबाइलवर सतत बोलत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या त्यामुळे वर्गात शिकवत असतान वैयक्तिक वापरासाठी बोलण्यासाठी मोबाइल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यापुढे मोबाइलचा वापर फक्त शैक्षणिक कारणासाठी करता येणार आहे.
…तर ‘त्या’ दिवसाचे वेतन नाही
■ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी संबंधित शाळा मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची लेखी परवानगीशिवाय व अत्यावश्यक कामाशिवाय विनाकारण विनापरवानगी वरिष्ठ कार्यालयात न येण्याचे आदेश दिले आहेत.
विनाकारण कार्यालयात आल्यास अशा शिक्षकांना त्या दिवसासाठी विनावेतन करून शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येणार आहे.


0 Comments