मोठी बातमी...पोलिस, प्रेसच्या नावाचा वाहनधारकांकडून गैरवापर
सांगोला तालुक्यात अवैध कामांसाठी वाहनांचा वापर; पोलिसांकडून कारवाईची गरज
सांगोला तालुक्यात अनेक दुचाकी व चारचाकी गाड्यांवर पोलिस, प्रेस, नाना, काका, मामा व इतर काही नावे व नंबर टाकत आहेत. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
अशी नावे टाकलेल्या चारचाकीमधून अनेक अवैध व्यवसाय केले जातात. काही गाड्या चोरीच्याही वापरल्या जातात.
यामुळे अशा नंबर नसलेल्या गाड्यांवर पोलिसयंत्रणा कधी कारवाई करणार, असा प्रश्न सामान्य वाहनधारक करत आहेत.
सांगोला तालुक्यात काही नागरिक दुचाकी व चारचाकी गाडीवर पोलिस नाव टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सांगोला तालुक्यात दुचाकी व चारचाकी गाडीवर पोलिस नावाचा वापर करणे किंवा नाव टाकणे कायदेशीररित्या
नावाचा व शासनाच्या आदेश नाही, अशी काही त्यामध्ये स्पष्ट अ करता येणार नाही गाड्यांवर पोलिसगुन्हा आहे. सांगोला काही कारणास्तव कर्मचारी सोलापूरनावाचा वापर कोठेही करता येणार नाही...
शासनाच्या आदेशानुसार दुचाकी व चाकीगाडीवर पोलिस नाव टाकता येत नाही, अशी काही माहिती अधिकार कार्यकत्यांनी माहिती विचारली होती. त्यामध्ये स्पष्ट असे उत्तर दिले होते की,
पोलिस या नावाचा वापर कोठेही करता येणार नाही. काही शासकीय पोलिस कार्यालयावर आणि शासकीय गाड्यांवर पोलिस हा शब्द वापरता येईल. अन्य कोठेही नाही.
गुन्हा आहे. सांगोला पोलिस ठाण्यातून काही कारणास्तव एक पोलिस कर्मचारी सोलापूर येथे मुख्यालयात कामकाजासाठी पाठवला आहे.
तो कर्मचारी सध्या सांगोला येथे मुक्कामी आहे व तो अवैध वाळू वसुलीही करत आहे. त्याच्या गाडीवर पोलिस हे नाव टाकण्यात आले आहे. ही गाडी त्याने नेमलेल्या खासगी झीरो वसुलदाराकडे असते तसेच तो स्वतः
ही काही अवैध व्यवसाय करणारे युवक घेऊन वसुलीसाठी फिरत असतो. या झीरो वसुलदार व अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमुळे
सर्वसामान्य नागरिकांमध्ये पवराट पसरली आहे. या वाळूची वसुली करणाऱ्या पोलिसांचा व झीरो कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त करावा,
अशी मागणी जनतेमधून व्यक्त केली जात आहे. सांगोल्यात सांगोला पोलिस स्टेशन अशा दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर पोलिस नावाचा
वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करतील का, अशी चर्चा सांगोला तालुक्यात नागरिकांमधून केली जात आहे.


0 Comments