google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी ... समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात;25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Breaking News

मोठी बातमी ... समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात;25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

मोठी बातमी ...  समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा


भीषण अपघात;25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू 

नागपूरहून पुण्याकडे जात असलेली विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसच्या झालेल्या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना 

बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा जवळ पिंपळखुटा येथे घडली.यात सात ते आठ प्रवासी जीव वाचवण्यात यशस्वी ठरले.

. भरधाव वेगाने जाणारी बसचा टायर फुटून खांबाला धडकली नंतर दुभाजकाला धडकल्याने डिझेलचे टाकी फुटली व बस डाव्या बाजूला पलटी झाली. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग बंद पडला. 

यातचं बसनं पेट घेतल्यानं 25 जणांचा मृत्यू झाला. नागपूरहून छत्रपती संभाजीनगरला जाणारे दोन बस प्रवासी बचावले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जेवण केल्यानंतर बसचा प्रवास सुरु झाला होता.

 अर्ध्या तासानंतर पुलाच्या खांबाला धडकली आणि त्यानंतर दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर लगेच आग लागली.

 बसमध्ये आम्ही खाली पडलो त्यामुळं अपघात झाल्याचं समजलं. आमच्यासोबत एक प्रवासी होता त्यानं खिडकीची काच फोडली आणि आम्ही खिडकीच्या बाहेर निघालो.. 

खाली उडी मारुन बाजूला पळालो, असं अपघातात बचावलेल्या तरुणानं हर्षल हिवसे या तरुणानं एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. हा अपघात रात्री 1.26 मिनिटांनी झाल्याची माहिती आहे.

बसला अपघात झाल्यानंतर तात्काळ आग लागली.डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला, अशी माहिती बचावलेल्या प्रवाशांनी दिली. अपघातानंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशामन दल तातडीनं दाखल झालं

विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरमधून चार वाजता निघाली होती. त्यानंतर वर्धा येथे गेली. तिथं प्रवासी घेतले. त्यानंतर प्रवासी यवतमाळमध्ये देखील बसमध्ये बसले होते.

 नागपूरमधून 7 ते 8 प्रवासी बसमध्ये बसल्याची माहिती आहे.ही बस नागपूरहून निघाली होती. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक प्रवासी असल्याची सूत्रांची माहिती आहे.

 रात्रीचा प्रवास असल्यानं बसमध्ये दोन चालक होते. त्यापैकी एक चालक आणि वाहक वाचल्याची माहिती समोर आली आहे.

 बसमधून मागच्या बाज चे प्रवासी प्रवास करत होते ते काचा फोडून बाहेर आल्यानं बचावले. या अपघातात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण बचावले आहेत.

Post a Comment

0 Comments