google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोदी @R महासंपर्क अभियानांतर्गत सांगोल्यात भाजपची सभा संपन्न... नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या दलालांची साखळी मोडीत काढून जनतेला न्याय दिला - प्रशांत परिचारक

Breaking News

मोदी @R महासंपर्क अभियानांतर्गत सांगोल्यात भाजपची सभा संपन्न... नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या दलालांची साखळी मोडीत काढून जनतेला न्याय दिला - प्रशांत परिचारक

मोदी @R महासंपर्क अभियानांतर्गत सांगोल्यात भाजपची सभा संपन्न...


नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या दलालांची साखळी मोडीत काढून जनतेला न्याय दिला - प्रशांत परिचारक 

सांगोला/ ( प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. संघटना स्तरावर कार्यकर्त्यांना मोटिव्हेट करण्याचे काम सुरू आहे. 

सांगोला तालुका गेली ७० वर्षे पाण्यासाठी संघर्ष करत आहे हे तालुक्याचे दुर्दैव आहे. माझा खासदार, 

आमदार काय कामे करतो हे विचारण्याचे धाडस लोकांमध्ये वाढले आहे. इथली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून 

असल्याने पाणी प्रश्न महत्वाचा आहे. आजही हक्काच्या पाण्यावर साठमारी होत आहे हा इतिहास आहे. 

स्व.सुधाकरपंत परिचारक, मोहिते-पाटील परिवाराने सहकारी संस्थेच्या माध्यमातून संघटना मजबूत केली आहे. 

मोदींनी ४९ कोटी लोकांना जनधन खाते उघडण्यास प्रवृत्त करून विरोधकांच्या दलालांची साखळी मोडीत काढली. 

१२ कोटी कुटुंबांना शौचालय, ९.५ कोटी कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन, ३.५ कोटी कुटुंबांना पीएम आवास योजना,

 ४१ कोटी तरुणांना मुद्रा योजनेतून २३ लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा, ४.५ कोटी लोकांना आरोग्य मदत, 

१२ कोटी शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये पेन्शन, ८० कोटी लोकांना मोफत रेशन, १२ कोटी घरापर्यंत हर घर जल योजना, २२० कोटी कोरोना लसीकरण डोस, 

८० कोटी लोकांना आयुष्यमान योजना, १ लाख ४४ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती, 

यासाठी २० लाख कोटी रुपये खर्च झाला असून सोलापूर जिल्ह्याला मिळाले ३० हजार रुपये मिळाले आहेत. 

देशात ९९२ मेडिकल कॉलेजची उभारणी, १४६२ विद्यापीठे उभारली आहेत. गेल्या ७० वर्षापासून गरिबी हटाव ही योजना मी ऐकत आहे, 

मात्र गरिबी हटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. 

राम मंदिर, ३७० कलम, समान नागरी कायदा यासाठी मोदींचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे- फडणवीस सरकारने ओबीसी समाजाला दहा लाख घरे उभारण्याचा निर्णय घेतला

 असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

मोदी @९ महासंपर्क अभियानांतर्गत सांगोल्यात भाजपच्या वतीने संयुक्त मोर्चा संमेलन व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 त्यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर , 

पश्चिम महाराष्ट्र संघटन सरचिटणीस मकरंद देशपांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, 

जयकुमार शिंदे, राजकुमार पाटील, माऊली हळवणकर, करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, 

तानाजी वाघमोडे, संभाजी आलदर, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, गजानन भाकरे, 

शिवाजीराव गायकवाड, शशिकांत देशमुख, दुर्योधन हिप्परकर, विजय बाबर, नागेश जोशी, नवनाथ पवार, दिलीप सावंत, आनंद फाटे, 

डॉ.परेश खंडागळे, बंडू केदार, विलास व्हनमाने, जयंत केदार, एन. वाय.भोसले, वसंत सुपेकर, बाळाप्पा येलपले, 

सिध्देश्वर गाडे, लक्ष्मण येलपले, मानस कमलापूरकर,गणेश घाडगे,किरण चव्हाण, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, गेल्या पाच वर्षांत खासदार फंडातून हायमास्ट, सभामंडप, बाजार कट्टा, 

रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वेळापूर ते सांगोला रस्त्यांसाठी ३५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. 

नीरा देवधर धरणातून दोन टीएमसी पाणी मंजूर झाले असून पुढील वर्षापासून माण नदीवरील बंधारे भरून दिले जाणार आहे. 

 यापुढील लोकसभा निवडणुका पाणी प्रश्नांवर होणार नसल्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले.

संघटन सरचिटणीस मकरंद देशपांडे म्हणाले, सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून नरेंद्र मोदींनी गेल्या ९ वर्षात

 विकासाचे काम केले आहे. विकासाचं राजकारण करणारा भाजप का पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, तालुकाध्यक्षपदाची 

जबाबदारी स्वीकारल्यानंतर तालुक्यात भाजपचे मजबूत संघटन उभारले आहे. टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा, 

जीहे कठापूर, उजनीचे दोन टीएमसी पाणी या सिंचन प्रकल्पातून तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. 

सध्या तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून तत्काळ पाणी सोडण्यात यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तालुक्यात विकासाची गंगा आणली आहे. 

राष्ट्रीय महामार्ग, शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वे, शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये, गोरगरिबांना घरे, रेशन दुकानातून मोफत धान्य यासह अनेक

 योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या आहेत. कृष्णा भीमा स्थिरीकरण हा महत्वाचा विषय आहे. प्रत्येक गावात भाजपचे संघटन उभारले आहे.

 येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यासह विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा झेंडा फडकविण्यासाठी

 सज्ज असल्याचे चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. यावेळी संभाजी आलदर, शिवाजीराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन भाकरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments