google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. इंदोरीकर महाराज अडचणीत, 'या' प्रकरणामध्ये न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. इंदोरीकर महाराज अडचणीत, 'या' प्रकरणामध्ये न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

 ब्रेकिंग न्यूज.. इंदोरीकर महाराज अडचणीत, 'या' प्रकरणामध्ये


न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. हभप इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून लिंगभेदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता.

 त्या वादानंतर इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात पोलिसात तक्रारीही दाखल झाल्या होत्या. आता या प्रकरणी इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करा असे आदेश दिले आहेत.

सम-विषम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगा-मुलगी होते असं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर पोलिसात तक्रार दाखल केली होती. तसंच खालच्या कोर्टात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

पण सेशल कोर्टाने गुन्हा रद्द केला होता. सेशन कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यावर हायकोर्टात सुनावणी झाली. आता हाय कोर्टाने इंदुरीकर महारांजांविरोधात गुन्हा दाखल करा असं म्हटलंय.

इंदुरीकर महाराजांना जिल्हा सत्र न्यायालायने दिलासा देताना त्यांच्यावरील गुन्हा रद्द ठरवला होता. पण या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन आणि राज्य सरकारकडून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. 

इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या किर्तनात लिंगभेदाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. यावर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी तक्रार दाखल केली होती.

Post a Comment

0 Comments