google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहर व ग्रामीण भागात आठवडा बाजार व जनावरे खरेदी विक्री बाजार मधील चोरीस गेलेला मोबाईलसह, मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद करून सुमारे ३,२४,५००/- रुपये किंमतीचे १३ महागडे मोबाईल जप्त करण्यास सांगोला पोलीसांना यश

Breaking News

सांगोला शहर व ग्रामीण भागात आठवडा बाजार व जनावरे खरेदी विक्री बाजार मधील चोरीस गेलेला मोबाईलसह, मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद करून सुमारे ३,२४,५००/- रुपये किंमतीचे १३ महागडे मोबाईल जप्त करण्यास सांगोला पोलीसांना यश

  सांगोला शहर व ग्रामीण भागात आठवडा बाजार व जनावरे खरेदी विक्री  बाजार  मधील चोरीस गेलेला


मोबाईलसह, मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद करून सुमारे ३,२४,५००/- रुपये किंमतीचे १३ महागडे मोबाईल जप्त करण्यास सांगोला पोलीसांना यश

सांगोला पोलीस ठाणे हददीत सांगोला शहर व ग्रामीण भागात आठवडा बाजार व जनावरे खरेदी दिखी बाजारमधुन ब-याच प्रमाणावर मोबाईल चोरीच्या घटना मागील काही दिवसात पडलेल्या होत्या

 या घटनाना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते या अनुशंगाने सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. ५३० / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल

 गुन्हयाचा तपास करीता असताना सांगोला आठवडा बाजार येथे दि.१८/०६/२०२३ रोजी सायंकाळी गस्त करीत असताना एक महिला व दोन इसम संशयितरित्या मोटार सायकलवरुन पळून जात असताना त्यांचा 

सांगोला पोलीस ठाणे कडील पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले असता त्यांना ताब्यात घेवून त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची 

नावे १. धन धुळा तुपे वय ६० वर्षे, २. नितीन अर्जुन तुपे वय ३० वर्षे, ३. महिला नामे शाहिदा महादेव तुपे वय ३८ वर्ष सर्व रा. पानवण, ता. माण, जि. सातारा अशी

 असल्याचे सांगीतल्याने सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपूस करून त्यांचकडून फिर्यादीसह एकुण १३ महागडे मोबाईलसह गुन्हयात चोरी करीता वापरण्यात

 आलेली मोटार सायकल अशी एकुण सुमारे ३,२४,५००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

जप्त करण्यात आलेल्या मोबाईल मध्ये थियो, ओप्पो, रेडमी, रिअलमी, सॅमसंग इत्यादी कंपनीचे महागडे मोबाईल आहेत. सदर आरोपीतांना अटक करुन गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.

आठवडा बाजार व जनावरांचा बाजार यामध्ये पोलीस अंमलदाराची प्रभावी गस्त करण्यात येत असून पोलीस ठाणे हददीत महूद, कोळा, जुनोनी, घेरडी या बाजारात सुदधा गस्त नेमण्यात येते 

त्यामुळे गत महिन्यात मोबाईल चोरीच्या घटनाना मोठया प्रमाणात आळा बसला असुन यापुढे ही आठवडया बाजार प्रभावी गस्त ठेवण्यात येणार आहे असे पोलीस निरिक्षक अंनत कुलकर्णी यांनी सांगीतले.

सदर मोबाईल हस्तगत करण्याची कामगिरी श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. हिंमतराव जाधव सो, अप्पर 

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेवा विभाग मंगळवेढा, पोनि श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली

 पोहेकॉ/१५४७ दत्ता वजाळे, पोहेकॉ / २६४ विकास क्षिरसागर, पोना/१४२५ बाबासाहेब पाटील, पोना/ १६७१ केदारनाथ भरमशेटटी, 

पो. कॉ. / ३३५ लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ युसूफ पठान यांनी मदत करून सदर चोरी झालेले मोबाईल हस्तगत केले आहेत.

Post a Comment

0 Comments