google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सर्व्हेतील आकडेवारीने सांगोल्यात परिवर्तनाचे संकेत राज्यातील निवडणूकपूर्व सर्व्हेमुळे राजकारण निघाले ढवळून

Breaking News

सर्व्हेतील आकडेवारीने सांगोल्यात परिवर्तनाचे संकेत राज्यातील निवडणूकपूर्व सर्व्हेमुळे राजकारण निघाले ढवळून

 सर्व्हेतील आकडेवारीने सांगोल्यात परिवर्तनाचे संकेत


राज्यातील निवडणूकपूर्व सर्व्हेमुळे राजकारण निघाले ढवळून

शेकापचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकन्यांच्या जिव्हाळ्याचा दूध दर 

आंदोलनास उत्तम प्रतिसाद मिळाल्याने तालुक्यात विद्यमान सरकार विरोधात असंतोष वाढला आहे. टेभू तसेच राजेवाडी तलावातून पाण्यावरून चांगलेच वातावरण तापले 

असून शेतकयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शेतकन्यांशी निगडित प्रश्न उपस्थित केल्याने त्यांच्याबद्दल तालुक्यात सहानुभूती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील नुकत्याच एका सत सांगोला मतदार संघातून विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील हे निवडणुकीत पिछाडीवर असल्याचा निवडणूक पूर्व अंदाज व्यक्त केला असता

 तरी तो अंदाज किती खरा हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. या निवडणूक पूर्व अंदाजाने शेकापने हरवून न जाता पक्षातील काही

 नाराज नेत्यांचे विरोधी पक्षाच्या कार्यालयात दररोज असणारी उठबस चर्चेचा विषय आहे. पक्षात राहून नेतृत्वाला खिंडीत गाठून पदे मिळवायची. पदाला चिकटून राहून विरोधकांशी हातमिळवणी करायची, अशी दुटप्पी भूमिका पक्षाला परवडणारी नाही.

 हे नाराज नेतेपक्षाशी नकळत बेमानी तर करीत नाही ना ? याचे आत्मरक्षण करावे लागणार आहे. असे असले तरी पक्षाचे मूळ कार्यकर्ते मात्र शेकापशी एकनिष्ठ असल्याचे दिसून येत आहे. 

त्यामुळे अशा दुटप्पी नेत्यांपासून पक्ष नेतृत्वास सावय रहावे लागणार आहे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तालुक्यात शेकापची घट्ट पकड कायम ठेवल्याने आगामी सर्वद निवडणुकीत याचा शेकापला निश्चित फायदा होणार आहे.

दुष्काळी सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, यासाठी निरा उजवा कालवा, डेंगू हैसाळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी के नागनाथ नायकवडी लोकनेते माजी 

आ. गणपतरावदेशमुख, भारत पाटणकर यांनी मोठा लढा उभा केला होता त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन केंद्र व राज्य सरकारने दुष्काळी योजनांसाठी मोठा निधी

दिला व हे प्रकल्प पूर्ण झाले. या योजनेतून शेतकयांच्या गरजेनुसार, मागणीनुसार पाणी सोडणे एवढेच काम असताना पिकासाठी पाणी वेळेवर सोडले जात नाही ही खरी शोकांतिका आहे. 

तालुक्यात विद्यमान आमदार, खासदार इतरनेत्यांनी गावभेट दौरा कार्यक्रमात तालुक्यातील माण, कोरडा व इतर नवांतून पाणी सोडले जाईल, असे आश्वासन दिले होते. 

सध्या पावसाने पाठ फिरवली आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उभी पिके करपू लागली असताना प्रकल्पातून पाणी सोडणे गरजेचे असताना पाणी सोडले जात नाही. 

यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. राजेवाडी तलावातून पाणी सोडावे, अशी मागणी असताना ते पाणी कटफळ तलावात सोडले जाते. लक्ष्मीनगर व आसपासच्या गावांना पाणी मिळाले नाही.

 त्यामुळे शेतकन्यांत तीव्र असंतोष आहे. एप्रिल महिन्यात शासनाने दुवास चार रु. प्रतीलिटर मात केली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या बायाचे भाव व पशू खाद्य गगनाला आहेत.

 दूध दर कपातीमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. हा मुद्दा पकडून डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दूध दरवाढ मिळावी, यासाठी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनास उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

मागील आठवड्यात न्यूज एरेना इंडिया पा संस्थेच्या सर्वेक्षणानुसार राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपापल्या मतदारसंघात कोणता पक्ष निवडून येईलए याचे सर्वेक्षण झाले. 

यामध्ये शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील पिछाडीवर असल्याचे अंदाज असता तरी निवडणूक पूर्व अंदाज खरे ठरतात, असे नाही.

याबाबत आ. शहाजीबापू पाटील हे निश्चित आहेत. मतदारसंघात केलेल्या कामाचाचत आपण समाधानी असल्याचे दिसून येते. त्यांनी

 मतदासंघांसाठी हजारो कोटी रुपयांचा नियो आणला आहे. अजूनही वर्षभरात विकास कामासाठी मोठा निधी आणणार असल्याचे

विधानसभा निवडणुकी अगोदर स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. सांगोला मतदारसंघाचा विचार केल्यास शेतकरीकामगार पक्ष विरोधात सर्व विरोधक (शिवसेना राष्ट्रवादी, 

राष्ट्रीय काँग्रेस, भाजप आरपीआय व इतर पक्ष) असा नवीन विचित्र पैटर्न निर्माण झाला आहे. हा सांगोला पैटर्न त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्याला तरी मान्य आहे का नाही हे कोडेच आहे.

 तसे पाहिले तर तालुक्यात फलक व विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मागे जनमत आहे. नेतृत्वाअभावी राष्ट्रीय काँग्रेस रसातळाला गेली आहे. 

बाकीचे इतर पक्षांना प्रत्यक्ष निवडणुकीसाठी इतर पक्षाशी साटेलोटे करावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजपचे पारडे जड आहे.

सांगोला मतदारसंघात भाजपने तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट जवळजवळ पूर्ण केले आहे. त्यामुळे माझा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपची जोरदार बांधणी सुरु केली आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पक्षाचा पाठिया गृहीत धरला जातो, पण 

विधानसभा निवडणुकीसाठी मात्र या तालुक्यातील नेते विचित्र व संधीसाधू आघाडीत सहभागी होतात अशी परिस्थिती आहे.

Post a Comment

0 Comments