google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या उदासिनतेमुळे वार्ड १ मधील नागरिक मुलभूत सुविधा पासून वंचित ; विविध मागण्यांसाठी लवकरच रास्ता रोको करणार !

Breaking News

सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या उदासिनतेमुळे वार्ड १ मधील नागरिक मुलभूत सुविधा पासून वंचित ; विविध मागण्यांसाठी लवकरच रास्ता रोको करणार !

 सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या उदासिनतेमुळे वार्ड १ मधील नागरिक मुलभूत सुविधा पासून वंचित ;


विविध मागण्यांसाठी लवकरच रास्ता रोको करणार !

सांगोला विषेश प्रतिनिधी ; सांगोला नगरपरिषदेच्या  वार्ड नंबर १ मधील  उत्तर भागात महुदरोड वर  असणाऱ्या मंडले,कोकरे,नायकुडे,चव्हाण, बंडगर, लवटे ईत्यादी व चिंचोली 

 रोडवर असणाऱ्या खंडागळे, नायकुडे बुरांडे,कोळेकर,जानकर, येडगे  या वस्त्यांवर नगराध्यक्ष ,नगरसेवक व न.पा.प्रशासनाकडून वारंवार अन्याय होत असल्याची भावना या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांची झालेली दिसत आहे. 

या वस्त्या फक्त नावालाच मतदाना पुरत्याच  शहर हद्दीत आहेत. शहराप्रमाणे या वस्त्यांवरील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सेवा उपलब्ध होत नाहीत. 

यातील बहुतांश वस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून १ रुपयांचा देखील खर्च न.पा.प्रशासनाने केला नाही. अनेक वर्षांपासून मागणी करुन देखील या भागात शहरा प्रमाणे सिंगल फिजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही.

 अनेक ठिकाणी रस्ते असताना या रस्त्यावर मुरमीकरण,खडीकरण, किंवा डांबरी रस्ते करण्यात आले नाहीत. वर्षातून एकदा किंवा दोनदाच औषध फवारणी केली जाते. 

अनेक वस्त्यांवर पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. विज,पाणी,आरोग्य, रस्त्याच्या समस्यांच्या मागणी साठी लवकरच महुदरोड वरील नायकुडे वस्तीजवळ रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा या भागात राहणाऱ्या नागरिकांना दिला आहे.

Post a Comment

0 Comments