google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातून अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास पन्नास हजार रुपये मदत

Breaking News

सांगोला तालुक्यातून अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास पन्नास हजार रुपये मदत

 सांगोला तालुक्यातून अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास पन्नास हजार रुपये मदत


महूद (वार्ताहर शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)- भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घुण हत्या नांदेड येथील बोडार (हवेली) येथे काही दिवसापूर्वी करण्यात आली आहे. यामुळे या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेऊन या घटनेचा निषेध करीत 

सांगोला तालुक्यातील समाजबांधव सामाजिक की म्हणून ५० हजार रुपये अर्थ अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास देण्यात आले.

सदरचे अर्थसहाय्य अक्षय भालेराव यांच्या आई वडील व भाऊ यांच्याकडे आदरणीय भंते धम्मदीप (बिहार) यांचे हस्ते देण्यात आले.

 यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल सावंत, पत्रकार वैभव काटे, बाबासाहेब सरतापे, दत्तात्रय मोरे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वप्निल सावंत, पत्रकार वैभव काटे, बाबासाहेब सरतापे, दत्तात्रय मोरे या मुलांच्या संकल्पनेतून अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास 

एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाज बांधवांकडून अर्थसहाय्य गोळा करून कुटुंबावर येणाऱ्या विविध अडचणीचा सामना करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे ठरवले. 

यावेळी सांगोला तालुक्यातील महूद, चिकमहुद, आचकदाणी, खवासपूर या सह अनेक गावांतील अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास या युवकांनी केलेल्या 

आव्हानाला पाठिंबा देत अर्थसहाय्य केले व समाज बांधवानी इतर तालुक्यातूनही अशाच प्रकारे मदत करण्याचे आव्हान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments