धक्कादायक... बापाने सुपारी देत केली मुलाची हत्या
कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
बापाने सुपारी देत केली मुलाची हत्या जन्मदात्या बापानेच सुपारी देत मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली.
पोलिसांनी काही तासांमध्येच या प्रकरणाचा उलगडा करत तिघांना ताब्यात घेतलं आहे.
तारदाळमध्ये (ता. हातकणंगले) ही घटना घडली. राहुल दिलीप कोळी (वय 31 रा. कोळी गल्ली, तारदाळ)
असे खून झालेल्याचे नाव आहे. दिलीप कोळी आणि विकास पोवार (दोघे रा. तारदाळ), सतीश कांबळे (रा. तमदलगे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. वडिलांनी 75 हजार रुपयांना सुपारी देऊन दोन
साथीदारांसह खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. शहापूर पोलिसांकडे याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.


0 Comments