भयंकर घटना...मावशीला भेटून निघालेल्या कुटुंबाचा अपघात;
मुलगा ठार तिघे जखमी : सांगोला-चिंचोली रस्त्यावर दुर्घटना
सांगोला : भरधाव कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात अपघातात १४ वर्षीय मुलाचा जागीच जाऊन आदळून झालेल्या मृत्यू पार्थ लाळे झाला,
तर वृद्ध महिलेसह तिघे जण जखमी झाले. अपघातातील कुटुंब हे मावशीला भेटून घरी परतत असताना ही घटना घडली.
पार्थ प्रमोद लाळे (वय १४) असे मृत मुलाचे नाव असून, हा अपघात शुक्रवार, २३ जून रोजी रात्री १० च्या सुमारास
सांगोला- चिंचोली रस्त्यावर एका फटाक्याच्या फॅक्टरीजवळ घडला.
या अपघातात प्रमोद अनिल लाळे (वय ३८), सुरेखा अनिल लाळे (वय ६८), नयन प्रफुल्ल लाळे (वय ११, सर्व जण रा. देशपांडे गल्ली, सांगोला) हे जखमी झाले.
त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात.उपचार सुरू आहेत. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले यांनी खबर दिली आहे.
या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद लाळे, मुलगा पार्थ लाळे, आई सुरेखा लाळे आणि पुतण्या नयन लाळे हे सारे जण मिळून
शुक्रवारी सायंकाळी ६.३०च्या सुमारास एम.एच.०५ / ए. एक्स. •००५२ या क्रमांकाच्या कारमधून पार्थ लाळे यांच्या मावशीला भेटण्यासाठी शिरभावी येथे गेले होते.
मावशीला भेटून रात्री ९.३०च्या सुमारास तेथून सांगोल्याकडे परतत होते. वाटेत प्रमोद लाळे यांचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे फटाक्याच्या फॅक्टरीजवळ कार रस्त्याच्या कडेला खड्डयात जाऊन आदळली.
अपघातानंतर जवान दादासाहेब बेहेरे यांनी जखमींना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढले अन् उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून सांगोला ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, पार्थ लाळे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता
0 Comments