ब्रेकिंग न्यूज.. भरधाव दुचाकी धोकादायक वळणावर भिंतीवर आदळली
महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू, मित्र गंभीर जखमी जवळा घेरडी रोडवर अपघात जखमीवर पंढरपूरमध्ये उपचार
सांगोला पंढरपूर येथून विठ्ठलाचे देवदर्शन आटोपून घराकडे येताना भरधाव दुचाकीचा धोकादायक वळणावर ताबा मोटारसायकल मंदिराच्या भिंतीवर जाऊन आदळली.
या भीषण अपघातात महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा महाविद्यालयीन मित्र गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
सुटला आणि हा अपघात बुधवारी रात्री १० यासुमारास सांगोला तालुक्यात जवळ रडी रस्त्यावर तरंगेवाडी येथे घडला. आंबेश्वर गुरुलिंग शेरखाने (वय २२) असे जागीच मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून
राहुल मंजय सुतार (23. दोघेही रा.रही, ता. सांगोला) असे जखमी मित्राचे तरुणाचे नाव आहे. दरम्यान बुधवारी सकाळीदुचाकीवरून पंढरपूर येथे विठ्ठल
रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून दुचाकीवरून सांगोलात दोघांनी मिळून जेवण केले. त्यानंतर दुचाकीवरून रात्री १० च्या सुमारास सांगोला जवळ घेरडी रोडने जातअसताना आंबेश्वरच्या भरघाव दुचाकीचा तरंगेवाडी
देवी धोकादायक वळणावर ताबा सुटला दुचाकी सरळ रस्त्यालगत मंदिराच्या भिंतीला जाऊन धडकली. अपघातात आंबेश्वर शेरखाने याच्या डोक्यास हातापायाला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला.
रासपचे पदाधिकारी धावून आले....
अपघातानंतर मित्र राहुल सुतार हा जखमी अवस्थेत त्याच ठिकाणी विव्हळत पडून होता. दरम्यान, नेमके त्याचवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सोमा मोटे हे त्याच रस्त्याने कारमधून जात होते.
त्यांनी अपघात झाल्याचे पाहून माहिती मृत व जखमींच्या नातेवाईकांना दिली. जखमी राहुल सुतार यास पुढील उपचारा करता पंढरपूरला दाखल करण्यास मदत
करून माणुसकी दाखवल्यामुळे राहुल याचे प्राण वाचले. दरम्यान, या अपघाताची गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती.तो बीएस्सीला होता; हा वखार चालवायचा
आंबेश्वर शेरखाने हा सांगोला महाविद्यालयात बीएस्सीच्या तृतीय वर्षांचे शिक्षण घेत होता तर त्याचा मित्र राहुल सुतार हा गावातच लाकडाची वखार चालवत होता.
दरम्यान, गुरुलिंग शेरखाने या शिक्षकाचा एकुलता एक मुलगा आंबेश्वर याचे अपघाती निधन झाल्याने शेरखाने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.


0 Comments