google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला मोठे यश होरपळणाऱ्या पिकांना मिळालेराजेवाडी तलावातील पाणी शेतकऱ्यांनी प्रफुल्ल कदम यांना घेतले डोक्यावर

Breaking News

प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला मोठे यश होरपळणाऱ्या पिकांना मिळालेराजेवाडी तलावातील पाणी शेतकऱ्यांनी प्रफुल्ल कदम यांना घेतले डोक्यावर

 प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला मोठे यश होरपळणाऱ्या पिकांना मिळाले



राजेवाडी तलावातील पाणी शेतकऱ्यांनी प्रफुल्ल कदम यांना घेतले डोक्यावर 

प्रफुल्ल कदम यांनी मानले जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (सोलापूर/ सातारा) आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार

सातारा- सांगली- सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असणारे आणि ब्रिटिशांनी बांधलेल्या राजेवाडी तलावाचे पाणी सांगोला तालुक्यातील

 लक्ष्मीनगर नरळेवाडी भागाला इंग्रज काळापासून मिळत होते.परंतु गेल्या आठवड्यात हे पाणी अचानक बंद केले होते. 

त्यामुळे त्या भागातील तब्बल 400 ते 500 एकर ऊस जळून चालला होता. शेतकरी उध्वस्त होण्याची वेळ आली होती.

 सर्व पातळीवर प्रयत्न केल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली मोठा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. परवा फलटण 

व पुणे सिंचन भवनला घेराव घालण्याचा इशारा प्रफुल्ल कदम यांनी दिला होता.

 त्यानुसार प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी फलटण कार्यालयाकडे आगेकूच केली होती. 

शेवटी आंदोलनकर्ते शेतकरी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची बैठक झाली 

आणि या बैठकीमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय झाला. 

या निर्णयानुसार लक्ष्मीनगर भागामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 प्रफुल्ल कदम यांनी अत्यंत अभ्यासपूर्णरित्या व धाडसाने आंदोलन केल्याने हे पाणी आल्याची भावना शेतकरी वर्ग बोलून दाखवत आहे.

 या आंदोलनाच्या यशानंतर प्रफुल्ल कदम यांनी सोलापूर जिल्हाधिकारी, सोलापूर पोलीस प्रशासन आणि जलसंपदा विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments