धक्कादायक घटना.. ऊस बिलासाठी शेतकऱ्याची सोलापुरात आत्महत्या
सोलापूर : अक्कलकोट : रुद्देवाडी (ता. अक्कलकोट) येथील मातोश्री साखर कारखान्याला पाठवलेले उसाचे बिल अद्याप मिळाले नाही. म्हणून दहिटणे (ता. अक्कलकोट) येथील एका ३७ वर्षीय शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
ही घटना दि. ८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता राहत्या घरी घडली आहे. याबाबत उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र संजय माने (वय ३७, रा. दहिटणे) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
याबाबत संजय भीमराव माने यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राजेंद्र याचे तब्बल २ लाख १५ हजार रुपये उसाचे बिल ७ महिने झाले तरी यासाठी वारंवार हेलपाटे कारखान्यावर मारण्यात आले असले तरी काहीच उपयोग झाला नाही.
गुरुवारी, (दि. ८ जून) सकाळी घरातील सर्वजण आपापल्या कामाला निघून गेल्यानंतर दुपारी बारा वाजता घरी आला होता. त्यानंतर घरातील स्लॅबच्या हुकास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, असा परिवार आहे.


0 Comments