सांगोला येथे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा पहिला दिवस सुरू..
जीवनात बोल भाषेलाच महत्व असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील
सांगोल्यातील साहित्य संमेलनात राजकारण्यांसह कवींनाही 'काय झाडी, काय डोंगर'ची भूरळ जीवनात बोल भाषेलाच महत्व असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले
सांगोला येथे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन शनिवार (ता. ८)पासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी उद्घाटन समारंभात राजकारण्यांसह कवी संमेलनातील कवींनाही
'काय झाडी, काय डोंगर..' या वाक्याची भूरळ पडलेली दिसून आली. साहित्य संमेलन सांगोल्यात असल्यामुळे सांगोल्याचे आमदारांच्या 'काय झाडी, काय डोंगर' पुन्हा चर्चेत आले आहे.
राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन हे ८ ते १० एप्रिल असे दोन दिवस होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील आहेत.
या साहित्य संमेलनामध्ये संमेलनाचे संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव, उद्घाटक महसूल मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,
स्वागताध्यक्ष सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे, या राजकारण्यांसह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "आमचे सहकारी बंधू शहाजीबापू पाटील हे 'काय झाडी, काय डोंगर' या वाक्यामुळे प्रसिद्ध झाले आहे. बापूंच्या या मायदेशी बोलीमुळे ते सर्वत्र ओळखले जाऊ लागले आहेत."
संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार शहाजी पाटील म्हणाले, "माझ्या दोन वाक्यामुळे मी आज प्रसिद्ध झालो आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये बोली भाषेलाच महत्त्व आहे."
संमेलनामध्ये दुपारच्या सत्रामध्ये कवी संमेलन झाले. या कवी संमेलनामध्येही कवी ज्ञानेश डोंगरे यांनी 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल.. ओकेमध्ये हाय' ही कविताच सादर केली. रसिक प्रेक्षकांकडून या कवितेला मोठी दादही मिळाली.
राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी राजकारण्यांसह कवींनाही सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या 'काय झाडी, काय डोंगर' या वाक्यांची भूरळ पडल्याचीच दिसून आले.


0 Comments