google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 "आम्ही महाविकास आघाडीचा तो डाव उलटवला"; शहाजीबापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Breaking News

"आम्ही महाविकास आघाडीचा तो डाव उलटवला"; शहाजीबापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

 "आम्ही महाविकास आघाडीचा तो डाव उलटवला";

शहाजीबापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

शरद पवारांचं उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर भाष्य, अंजली दमानिया यांचं अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं टि्वट, ठाकरे पवार भेट या सगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर राजकीय वातावरण अक्षरश : ढवळून निघालं आहे.

 याचदरम्यान, आता शिंदे गटाचे नेते व सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी महाविकास आघाडीतील अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आमदार शहाजीबापू पाटीलयांनी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील तसेच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांचा हळूवार प्लॅन सुरु होता. 

की, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना १० ते १५ जागांपेक्षा जास्त जागा निवडून येऊ द्यायच्या नाहीत. आणि त्याचवेळी दुर्दैवाने उध्दव ठाकरे हे कोरोना आणि आजारपणामुळे मंत्रालयात येत नव्हते.

हा धोका सगळा प्रकार आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेनेला पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आमच्या शिवसेनेचं नेतृत्व दिलं. 

आता आमची शिवसेना वाढणार आणि सगळ्या निवडणुका आम्ही भरघोस मतांनी जिंकणार असा आत्मविश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. ४० आमदारांना पाडण्याची तयारी अजित पवार आणि थोरातांनी केला होता. 

मात्र, आम्ही हा महाविकास आघाडीचा डाव उलटवला.यात माझाही समावेश होता असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटलांनी केला आहे. कधीही निवडणुका लागल्या तरी आम्ही मैदानात उतरण्यासाठी तयार आहोत असंही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments