खुशखबर..भीम जयंतीनिमित्त “घर बंदूक बिरयानी” फक्त १०० रुपयांत
नागराज मंजुळे यांनी यापूर्वी आपल्या प्रत्येक चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अगदी कल्पकतेने वापर करून वेगळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. फॅन्ड्री चित्रपटातही या प्रतिमेचा वापर करण्यात आला होता.
याशिवाय झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतात असा सीन दाखवण्यात आला आहे.
बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत असलेला “घर बंदूक बिरयानी” हा चित्रपट खास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
फक्त १०० रुपयांत पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शनच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याची घोषणा करण्यात आली आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे चित्रपट म्हटले की, सुपरहिट होणारच हे समीकरण बनून राहिले आहे. नागराज मंजुळे यांनी यापूर्वी निर्माण केलेल्या फॅन्ड्री, सैराट, झुंड या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. सध्या सुरू असलेला
“घर बंदूक बिरयानी” हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला नसला तरी त्यांच्या आटपाट प्रोडक्शन हाऊसकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नागराज मंजुळे हे स्वतः या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत.
याशिवाय सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची भूमिका महत्त्वाची आहे. आकाश ठोसर आणि सायली पाटील या जोडीने चित्रपटात धमाल केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर विविध अंगाने चर्चा होताना दिसत आहे.
नागराज मंजुळे हे ज्या चित्रपटात असतात ते चित्रपट हमखास सामाजिक भाष्य करतात असे प्रेक्षकांनी गृहीत धरले आहे.
“घर बंदूक बिरयानी” हा चित्रपट सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर बोट ठेवणारा चित्रपट आहे. नक्षली भागातील काही संवेदनशील विषयांना समोर ठेवून या चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे.
मंजुळेंवर बाबासाहेबांचा प्रभाव
नागराज मंजुळे यांनी यापूर्वी आपल्या प्रत्येक चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अगदी कल्पकतेने वापर करून वेगळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
फॅन्ड्री चित्रपटातही या प्रतिमेचा वापर करण्यात आला होता. याशिवाय झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतात असा सीन दाखवण्यात आला आहे.
एकूणच नागराज मंजुळे यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे प्रकर्षाने दिसून येते आणि त्या प्रेमापोटीच नागराज मंजुळे यांनी “घर बंदूक बिरयानी” हा चित्रपट खास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ शंभर रुपयात दाखवण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते. बुक माय शो या वेबसाईटवरून तिकीट बुक करता येतील याची लिंक सदरच्या बातमीच्या तळाशी दिली आहे.
“घर बंदूक बिरयानी” या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर अनेक साधक-बाधक चर्चा होताना दिसत आहेत. मात्र या चर्चातून नागराज मंजुळे यांच्या विविध कार्य शैलीचे विवेचन होताना दिसते. शिवाय नागराज मंजुळे यांच्याकडून प्रेक्षक मोठ्या प्रमाणात अपेक्षा व्यक्त करतात असेही दिसून येते.
नितीन थोरात लिहितात की, घर बंदूक बिर्याणी बघितला. लय आवडला. म्युझिकच्या वेळी तर थेटरात नाचावं असंही बरेचदा वाटलं. चाल थोडी बिघडली तर? हे वाक्य ट्रेलरमध्ये का होतं,
याचा प्रत्येकवेळी अनुभव येतो. कारण तुम्ही नागराज अण्णाची जी चाल डोक्यात ठेवलेली असती, ती चालच बिघडुदे की म्हणत नागराज तुमच्यासमोर येतो आणि तुमच्या अपेक्षांना सुरुंग लावतो.
‘लय झालं सामाजिक, सामाजिक थोडं हलकं फुलकंबी झालं पायजे की,’ असं नागराज म्युझिक लाँचच्यावेळी म्हणाला होता. शिवाय ‘कुणाला पिक्चर आवडेल कुणाला नाय आवडणार,
पण तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक एन्जॉय करणार’ असंही प्रीमियरच्या टायमाला म्हणाला होता.थोडक्यात काय तर कितीबी भारी बिर्याणी केली तरी लोकं नावं ठेवतातच, हे त्यानं स्वत: गृहित धरलं असावं.
मराठीत पहिल्यांदा शंभर कोटी क्रॉस करणारा सैराटही नागराजनेच बनवला होता, अन् त्या पिक्चरलाही आपल्याच मराठी माणसांनी नावं ठेवली होती. त्यामुळं बिर्याणीला नाव ठेवणारीही लोकं असणार, हे त्यालाही माहिती असावं.
आता मला पिक्चर आवडला म्हणून प्रत्येकाला आवडला पाहिजेच, असं आजिबात नाही. मुळात आपण अपेक्षेचा बोजा बोकांडी घेऊन थेटरात जातो अन् आपल्याला वाटतं नागराजचा पिक्चर आहे, म्हणल्यावर काहीतरी सामाजिक आणि लॉजिकेबलच असलं पाहिजे.
थोडक्यात सचिन तेंडुलकरनी सेंच्युरीच मारली पाहिजे, अण्णा हजारेंनी उपोषणालाच बसलं पाहिजे, अन् रोहित शेट्टीच्या पिक्चरमध्ये गाड्या उडल्याच पाहिजेत ही गृहितकं आपण आपल्या मेंदूला इतकी चिकटून ठेवल्यात की आपल्याला त्या माणसानं वेगळं काय केलेलं पटतच नाय.
घर बंदुक बिर्याणीमध्ये नागराजचा अभिनय, सोमनाथ अवघडेचा डान्स, सूरज पवारचं विकृत हसणं. अरबाजचा अटिट्यूड, आकाश ठोसरच्या चेहऱ्यावरचा निरागस
गोडवा, सायली पाटीलचं नितळ सौंदर्य, सयाजी शिंदेमधला गोंधळलेला पल्लम, विठ्ठल काळेचा कर्तव्याप्रती फोकस्ड असलेला जॉर्ज, भुषण मंजुळेने स्टोरीला दिलेली कलाटणी सारं काही बघण्यासारखं आहेच की.
सैराटमध्ये आरची परशाची एकच गोष्ट होती तर फँड्रीमध्ये जब्याची एकच गोष्ट होती.
झुंडमध्ये जशा दहा बारा गोष्टी होत्या, तशा घर बंदुकमध्ये तीन गोष्टी एकत्र असल्यामुळे आपलं एका गोष्टीवर लक्ष लागत नाही. त्यामुळं आपण म्हणतो पिक्चर गंडलाय. पण, पिक्चर आजिबात गंडलेला नाही. प्रचंड सुंदर निर्मिती आहे.
पुर्णत्वाची सवय असलेल्या आपल्यासारख्या प्रेक्षकांना अपुर्णत्वातही शेवट असतो, हे हा चित्रपट समजावून सांगतो. फक्त चित्रपट पाहताना सैराट, फ्रंड्रीचे विचार थेटरबाहेर ठेवायला लागतात.
शेवटी नागराज मंजुळे म्हणलं की पिक्चरमध्ये रॉ मटेरियल येणार हे खरं. अन् रॉ मटेरियल म्हणजे कचरा आलाच. आता तुम्ही कचरा चावत बसायचं की त्यातलं चांगलंचुंगलं निवडून खायचं हा प्रश्न तुमचा, असे नितीन थोरात यांनी लिहिले आहे..
नागराज मंजुळे या नावाचे गारुड
पिस्तुल्यापासून नागराज मंजुळे या नावाचे गारुड सुरु झाले. ते फँड्री, सैराट, झुंड या क्रमाने अधिक पकड घेत गेले. घर,बंदूक,बिर्याणी हा चित्रपट प्रदर्शित झाला. समीक्षक व प्रेक्षकांचा संमिश्र असा प्रतिसाद मिळाला आहे.
चित्रपट पाहताना लक्षात आले कि नागराज मंजुळे यांना मराठी चित्रपटाचा कॅनव्हास मोठा करायचा आहे.
अर्थात यामुळे टिपिकल मराठी चित्रपट थेट झेप घेऊन हाॅलिवूडशी शर्यत करणार नाही पण त्याला त्याचा स्वतःचा असा सुगंध असला पाहिजे, त्याची स्वतःची अशी मजा पाहिजे, याबद्दल नागराज आग्रही असल्याचे जाणवते.
घर बंदूक बिर्याणी चित्रपटाचे प्रमोशन छान झाले होते, ट्रेलर बहुचर्चित ठरला होता, गाणी सर्वत्र वाजत होती.
या साऱ्या गोष्टींचा चित्रपटाला फायदा झालाच आहे. पब्लिक थिएटरपर्यंत आणलं गेलं आहे. सामान्य तरुण, अस्वस्थ तरुण पोलिस आणि विद्रोही तरुण या तरुणाईला एका सुंदर कथानकात बांधण्यात नागराज टिम यशस्वी झाली आहे.
आकाश ठोसर, नागराज, सयाजी शिंदे हे मुख्य कलाकार आणि अन्य दुय्यम अशी बाब यात जाणवत नाही, कारण या चित्रपटात साताऱ्याची श्वेतांबरी घुडे, बार्शीचा विठ्ठल काळे, नागपूरचा नीरज जमगाडे- मायकल,
सोलापूरचा सोमनाथ अवघडे, नांदेडचा संतोष व्हडगीर (नाईक), भंडाराचा ललित मटाले, औरंगाबादचा प्रवीण डाळिंबकर, यवतमाळचा किरण ठोके, सोलापूरचा सुरज पवार यांनी या चित्रपटात चार चाँद लावले आहेत. तर नांदेडचा किशोर निलेवाडी,
नागपूरचा प्रियांशू छेत्री- बाबू, पुण्याचा सुभाष कांबळे, इचलकरंजीचा गिरीश कोरवी, औरंगाबादचा चरण जाधव, बीडचा अशोक कानगुडे, जळगावचा आशिष खाचणे असे दमदार कलाकार आहेत ज्यांच्यामुळे ही बिर्यानी रुचकर झाली आहे.
यातील नागराजचे पात्र लार्जर दॅन लाईफ, बेदरकार साकारले आहे आणि अण्णा त्यात शोभलाही आहे. अनेक फ्रेम्सवर सिंघमचा प्रभाव जाणवतो.
पण हा पोलिस फिल्मी न वाटता जमिनीशी अधिक प्रामाणिक जाणवतो. हा चित्रपट परत दुसर्यांदा पहायचा ठरवला तर तो यातील गाणी, नागराजचा रोल आणि छायाचित्रणासाठी पाहणे आवडेल.
सर्वांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जावून पाहिलात, तर नक्कीच येत्या काळात नागराज युनिवर्स विस्तारण्याचे कामात हातभार लावल्याचे समाधान व आनंद नक्की मिळेल.
0 Comments