google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील निधी समाज कल्याणचा टक्केवारीचा फायदा तीन पक्षांचा RPI तालुकाध्यक्ष मा. खंडू(तात्या )सातपुते

Breaking News

सांगोला तालुक्यातील निधी समाज कल्याणचा टक्केवारीचा फायदा तीन पक्षांचा RPI तालुकाध्यक्ष मा. खंडू(तात्या )सातपुते

सांगोला तालुक्यातील निधी समाज कल्याणचा टक्केवारीचा फायदा तीन पक्षांचा RPI तालुकाध्यक्ष मा. खंडू(तात्या )सातपुते 

सांगोला:- महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत दलित वस्ती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे या कामे दरवर्षी सांगोला तालुक्याला कोट्यावधी रुपयाचा निधी मिळत असून हा निधी शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप पक्ष मिळून वाटप करून घेऊन आपापल्या कार्यकर्त्यांना कामे देत

 असून इतर मित्र पक्षांना निधी मिळू नये व कामे द्यायची नाहीत असा नवीन फंडा अमलात आणला आहे. आमदार शहाजी बापू पाटील हे आमदार झाल्यापासून बापू आबा सुचवतील ती सांगोला तालुक्यातील विकास कामे मंजूर होत आहेत.

 ही बाब शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासह त्यांच्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना लक्षात आले असता शेका पक्षाचे सांगोलातालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायत मध्ये सत्ता आहे अशा ग्रामपंचायतीला हा निधी मिळावा यासाठी जिल्हा परिषद सोलापूर येथे शाखा पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. 

त्यावेळी शेका पक्षाने आमच्या ताब्यातील ग्रामपंचायतला दलित वस्तीचा प्रत्येक वर्षी नियमाप्रमाणे येणारा निधी मिळावा यासाठी आग्रहाची मागणी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे केली होती.

चालू सन 2022 23 मध्ये आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला पाच कोटी तेवीस लाखाचे कामे सुचवली होती. 

त्यापैकी त्यांना तीन कोटी वीस लाख रुपये कामांनामंजुरी मिळाली व शेका पक्षाच्या ग्रामपंचायतीने सुचवलेल्या कामांना दोन कोटी तीन लाख रुपये विकास कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. ही सर्व दलित निधीची कामे मंजूर करत

 असताना सांगोल्यातले सत्ताधारी तीन पक्ष या विकास कामांमधील टक्केवारीचा निधी मिळून मिसळून वाटून प्लॅनिंग करून खात असल्याची माहिती आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू तात्या सातपुते यांनी दिली आहे. हा निधी प्रत्येक वर्षी दलित विकास कामांसाठी येत

 असून सांगोल्यातील दलित नेतृत्वाला या निधीच्या कामे कसल्याही प्रकारे विश्वासात घेतले जात नाही. ही कामे करत असताना अनुसूचित जाती जमातीचे ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांना विश्वासात घेऊन कामे करावे

 असा शासनाचा जीआर असताना सुद्धा एकाही पदाधिकाऱ्याला विचारात घेतले जात नाही.हे तिन्ही पक्ष आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना कामे न देण्याचा पांडा पाडलेला आहे. आर्थिक दृष्ट्या एकाही दलित कार्यकर्त्याला पक्ष करत नाहीत.

 या तीन पक्षांमधील कार्यकर्त्यांना व त्यांच्या समाजातीलच ठेकेदारांना कामे मंजूर करून तुला पण टक्केवारी खा व मला पण त्या टक्केवारी मध्ये हिस्सा दे असे नियोजनबद्ध प्लॅनिंग करून दलित निधीमध्ये हे आजी-माजी आमदार व नेतेमंडळी टक्केवारीचा आर्थिक घोटाळा करत आहेत.

एकेकाळी एकमेकांच्या विरोधामध्ये हे तीन पक्ष सांगोला तालुक्यामध्ये निवडणूक लढवत असतात परंतु दलित निधीचा गैरवापर करण्यासाठी व त्यातनिधीचा गैरवापर करण्यासाठी व त्यात दलित निधीमधून टक्केवारी मिळण्यासाठी मात्र हे एकत्र आलेले आहेत 

त्यामुळे सांगोला तालुक्यातील दलित निधीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असून या निधीचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी व दलित निधी योग्य मार्गे कामे लागण्यासाठी व त्याचे काम दर्जेदार प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये होण्यासाठी आरपीआयचे खंडू तात्या सातपुते लवकरच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब ,

 मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाज कल्याण मंत्री महाराष्ट् राज्य महाराष्ट्र आरपीआय आठवले प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, अनुसूचित जाती जमाती आयोग तसेच 

टक्केवारी घेणाऱ्या वर कारवाई करण्यासाठीअँटी ब्युरो करप्शन कडे पुरविणीशी लेखी तक्रार देणार असल्याची माहिती आरपीआयचे तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते यांच्याकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments