google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..अखेर” गुणरत्न सदावर्ते यांना सार्वजनिक ठिकाणी वकिलीचा गणवेश घालणं प्रकरण भोवलं..वकिली सनद दोन वर्षासाठी रद्द

Breaking News

मोठी बातमी..अखेर” गुणरत्न सदावर्ते यांना सार्वजनिक ठिकाणी वकिलीचा गणवेश घालणं प्रकरण भोवलं..वकिली सनद दोन वर्षासाठी रद्द

 मोठी बातमी..अखेर” गुणरत्न सदावर्ते यांना  सार्वजनिक ठिकाणी वकिलीचा गणवेश घालणं प्रकरण भोवलं..

वकिली सनद दोन वर्षासाठी रद्द 

अखेर मराठा आरक्षण ते एसटी महामंडळ,जुनी पेंशन आंदोलन..  विषय संदर्भात वकीली  करत प्रचंड गाजलेले  वकील अखेर” गुणरत्न सदावर्ते यांना  सार्वजनिक ठिकाणी वकिलीचा गणवेश घालणं प्रकरण भोवलं आहे.

नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार,एसटी कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील आजाद मैदानावरील संपात सहभागी होत असताना वकिलीचा गणवेश घालून तिथे केलेला डान्स आणि सार्वजनिक सहभाग  वकील गुणरत्न सदावर्ते यांना चांगलाच भोवला असून दोन वर्ष त्यांना कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाहीये.

प्राप्त माहिती नुसार,गुणरत्न सदावर्ते यांचे आझाद मैदानावरील उल्लंघन वकील सुशील मंचरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट बार कौन्सिल कडे तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल घेऊन गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बार कौन्सिलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

काही महिन्यांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपातील कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढवली होती.

वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने मोठा झटका देण्यात आलेला आहे

वकील सुशील मंचरकर यांनी बार कौन्सिल यांच्याकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवर तीन वकिलांच्या समितीने तपासणी करून गुणरत्न सदावर्ते यांना दोन वर्ष कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाही. 

अशा स्वरूपाची कारवाई केलेली आहे. एकूणच गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षासाठी सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. बार कौन्सिलच्या नियम सात नुसार गुणरत्न सदावर्ते यांनी उल्लंघन केलं होतं आणि त्यावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे

Post a Comment

0 Comments