औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगोला येथे ड्रेस मेकिंग प्रदर्शन व यशस्वी उद्योजिका व यशस्वी प्रशिक्षणार्थी सत्कार समारंभ संपन्न
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
सांगोला (प्रतिनिधी): औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगोला येथे 24 मार्च रोजी ड्रेस मेकिंग प्रदर्शन आयोजीत करणेत आले होते.
यावेळी विदयार्थी व नागरीकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. दुपार नंतरचे सत्रात यशस्वी प्रशिक्षणार्थी व यशस्वी उद्योजिका यांचा सत्कार करणेत आला. मुंबई येथे कौशल्य रोजगार उदयोजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित केलेले
जागतीक महिला दिन महानारी सन्मान सोहळा पुरस्कार प्राप्त राज्यपाल पुरस्कृत शिल्प निदेशिका सौ. रेणुका प्रकाश गव्वल यांचा सत्कार संपन्न झाला. यशस्वी उद्योजिका म्हणुन सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त पुणे येथे यशस्वी गौरव पुरस्कार प्राप्त झालेले सौ. आरजुमंदबानु अयुब पटेल यांचा यावेळी सत्कार करणेत आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ओंबासे साहेब प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था पंढरपुर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख अतिथी सौ. माधवी नाळे, कृषी सहायक अधिकारी सांगोला श्री. बबन घाडगे, महेश मासाळ शिल्प निदेशक व अहीवळे मॅनेजर श्रीराम गारमेंट सांगोला हे उपस्थित होते.
मा. श्री. राजेंद्र आवाडे, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगोला यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मोठया उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानिका वसेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन माने सर यांनी केले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगोला येथील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होणेकरीता शिकलगार सर, कुलकर्णी सर, अत्रे सर, माने सर, देवळे सर, फुले सर, काझी सर कर्मचारी सावंत चव्हाण यांनी विशेष परीश्रम घेतले.


0 Comments