सांगोला राजमाता महिला नागरी पतसंस्थेतील नूतन संचालिकांचा सत्कार संपन्न
सांगोला/प्रतिनिधी:
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
धनगर समाज सेवा महिला मंडळ सांगोला यांच्या वतीने काल राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेतील नूतन संचालिकांचा सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजमाता महिला नागरी सह. पतसंस्थेच्या नूतन चेअरमन श्रीमती लतिका मोटे, व्हा. चेअरमन सौ. दिपाली निंबाळकर, संचालिका सौ. सिंधुबाई भोकरे, सौ. राणी संजय माने, सौ. स्वप्नाली सादिगले, सौ. नकुशा जानकर, सौ. पूजा गाडेकर, सौ. श्वेता धनवजीर, सौ. रेश्मा गावडे,
नसरीन तांबोळी, सौ. जानकी घाडगे, सौ. कविता वाघ यांच्यासह धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रूपालीताई मदने, माजी नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, सौ. मिनाक्षीताई गडदे, सौ. कौशल्या गावडे, शांता हाके, अनिता जानकर यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. ज्योती चोरमुले यांनी केले व नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या


0 Comments