पंढरपूर तालुक्यात करकंब पोलीस स्टेशन हद्दीत मर्डर!पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने प्रेत विहिरीत दिले फेकून
करकंब ता.पंढरपुर शेतीचे वाद हे कोणत्या टोकाला जातील हे सांगता येत नाहीत,काही जण वाद नको म्हणून न्यायालयात जातात,तर काही ठिकाणी थेट वाद होऊन पोलिसांत तक्रार दाखल होते
करकंब पोलीस स्टेशन हद्दीत २७ गावांचा समावेश आहे,मात्र सर्वाधिक वाद हे शेतीच्या, बांधाच्या कारणावरून दाखल करण्यासाठी येतात.काही दिवसांपूर्वी जळोली येथील बांधाच्या दगडावरून झालेली हाणामारीची घटना
ताजी असतानाच करकंब पोलीस स्टेशन हद्दीत चिलाईवडी गावात जमिनीच्या रस्त्याचा बांध यावरून एका साठ वर्षीय वृद्धाच्या डोक्यावर अज्ञात हत्यार मारून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने प्रेत विहिरीत फेकून दिल्याची तक्रार करकंब पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
या बाबतीत करकंब पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार व फिर्यादी रमेश वामन जमदाडे चिलाईवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीचा गेली दहा वर्षे शेता शेजारील लोकांशी शेतीच्या कारणावरून वाद होता,हा वाद न्यायालयात सुरू होता, त्या वादाची तारीख दि.10/03/2023 ही होती.
या कोर्टातील तारखेला फिर्यादचे वडील वामन दशरथ जमदाडे, तसेच फिर्यादीच्या चुलत भावाचा मुलगा बाळासाहेब नागनाथ जमदाडे व नानासो बाबासो सलगर असे कोर्टात गेले असता फिर्यादीच्या फिर्यादीनुसार 3)भारत कुंडलिक माळी त्यांनी तुला बघून घेतो अशी धमकी दिली होती ती वडिलांनी फिर्यादीस घरी आल्यावर सांगितली होती.
फिर्यादीच्या फिर्यादीनुसार पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.११/०३/२०२३ रोजी रात्री मध्यरात्री ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात हत्याराने मारून मयत वामन दशरथ जमदाडे वय 60 वर्षे यांचे प्रेत पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने विहिरीच्या पाण्यात फेकून दिले
अशी तक्रार करकंब पोलीस ठाण्यात दाखल झाली असून,संशयित 1)अनिल कुंडलिक माळी 2)दत्तात्रय कुंडलिक माळी 3)भारत कुंडलिक माळी रा. चिलाईवाडी ता.पंढरपूर विरुद्ध भा.द.वि. कलम 302,201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.या घटनेचा पुढील तपास पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. निलेश तारू हे करीत आहेत.
मात्र या घटनेने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
【घटनेचे गांभीर्य ओळखत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश तारू व करकंब पोलीस पथकाने तीन संशयित आरोपींपैकी एकास अटक केली आहे तर,दोन जणांचा शोध सुरू आहे】
0 Comments