google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बारावीचा गणिताचा पेपर कसा फुटला, १२ हजारांना विक्री, पोलिसांनी डिलीट केलेला व्हॉट्सॲप ग्रूप शोधला

Breaking News

बारावीचा गणिताचा पेपर कसा फुटला, १२ हजारांना विक्री, पोलिसांनी डिलीट केलेला व्हॉट्सॲप ग्रूप शोधला

 बारावीचा गणिताचा पेपर कसा फुटला, १२ हजारांना विक्री, पोलिसांनी डिलीट केलेला व्हॉट्सॲप ग्रूप शोधला

बारावीच्या पेपर फुटी प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. आतापर्यंतच्या तपासावरुन एका मोठ्या रॅकेटंतर्गत गणिताचा पेपर फोडण्यात आल्याचे दिसत आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलिस ठाणे हद्दीतील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेरून पेपर सुरू होण्याआधी अर्धा तास अगोदर गणिताच्या पेपरची दोन पाने व्हाटसअपवर व्हायरल झाली होती.

विशेष बाब म्हणजे, राजेगावप्रमाणेच मुंबईतील एका परीक्षा केंद्रावरूनदेखील बरोबर १० वाजून १७ मिनिटांनी हा पेपर एका व्हाटसअपग्रूपवर व्हायरल झाला होता. त्यामुळे राजेगाव येथील पेपरफुटीचे मुंबई कनेक्शन चव्हाट्यावर आले असून, एका विद्यार्थ्यांकडून १० ते १२ हजार रुपये घेऊन हा पेपर फोडण्यात आल्याचा संशय निर्माण झालेला आहे.

पेपरफुटीच्या रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा निर्धार कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डीवायएसपी यामावार यांनी केला आहे. त्यांच्या नेतृत्वात साखरखेर्डा पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात, या पेपरफुटीप्रकरणामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

 यामध्ये दोन शिक्षकांनादेखील ताब्यात घेण्यात आलेले आहे. हे सर्वजण शेंदूरजन, बिबी, किनगावजट्टू, व भंडारी या गावातील आहेत.राजेगाव येथील पेपरफुटीप्रकरणाचे राज्यस्तरीय धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता असून, हे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे.

 मुंबईतील दादर येथील डॉ. अ‍ॅण्टोनिओ डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या मोबाईलमधून या पेपरचा काही भाग मुंबई पोलिसांनी जप्त केला आहे. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेकडे सोपविले आहे.या पेपरफुटीचे धागेदोरे राजेगाव पेपरफुटी प्रकरणाशी असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेऊन पेपर फोडण्यात आल्याचा प्राथमिक संशय असून, याबाबत मुंबई गुन्हे शाखा व डीवायएसपी यामावार यांच्या नेतृत्वात साखरखेर्डा पोलिस कसून तपास करत आहेत. काही महत्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Post a Comment

0 Comments