चौदा महिन्यांच्या चिमुरडीला कारने चिरडले
सोलापूरसह अन्य भागात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच एक घटना नाशिक शहरातून समोर येत आहे. वडिलांच्या डोळ्यासमोरच 14 महिन्याच्या चिमूरडीला कारने चिरडले आहे. नाशिक शहरातील विराट नगर येथे ही दुर्घटना घडली.
कार मागे घेताना अंगणात खेळणाऱ्या 14 महिन्यांच्या चिमूरडीच्या अंगावर ही कार गेली. या दुर्दैवी घटनेत तिचा मृत्यू झाला. आयजा अमजद खान या चिमुरडीचे नाव आहे. अमजद हे काल आपल्या पत्नीसोबत घरासमोर गप्पा मारत बसले होते. तर त्यांची मुलगी घराच्या अंगणात खेळत होती.
याच वेळी त्यांच्या घराशेजारी राहणारे हुसेन खान हे कार मागे घेत असताना कारच्या मागे खेळत असलेली आयजा कार खाली सापडली. तिच्या अंगावरून कारचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी हुसेन यांना पोलिसांनी अटक केली आहे.


0 Comments