लहुजी शक्ती सेनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी - जयसिंग मस्के
पंढरपूर तालुक्यातील खेडभाळवणी चे जयसिंग मस्के यांची निवड करण्यात आल्यामुळे पंढरपूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे दि. २३\१२०२३ रोजी पंढरीत लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला. संस्थापक- अध्यक्ष , विष्णूभाऊ कसबे यांच्या आदेशानुसार या निवडी करण्यात आल्या.
तसेच पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी... देविदास कसबे तर पंढरपूर, तालुकाध्यक्ष पदी... मुकुंद घाडगे व उपाध्यक्ष पदी.. समाधान वायदंडे, आप्पा वाघमारे तर तालुका संघटक पदी... सरकोलीचे गणेश लोंढे व सचिव पदी... बापु घाडगे यांची निवड करण्यात आली... या वेळेस संस्थापक अध्यक्ष - विष्णूभाऊ कसबे,
कोअर कमिटी प्रदेशाध्यक्ष. कैलासभाऊ खंदारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष- महादेव महाराज भोसले, जिल्हाअध्यक्ष- वसंत देडे, जेष्ठ नेते- अशोक पाटोळे,माजी.पंचायत समिती सदस्य- सत्यवान देवकुळे, नारायण गायकवाड, दुर्योधन लोखंडे, कुमार गायकवाड, चेतन मस्के, राहुल मस्के, इ.
यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग मस्के म्हणाले की समाजातील लहान थोर बांधवांनी माझ्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकल्याने समाजातील सर्व बांधवांना बरोबर घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम वेळोवेळी करणार असल्याचे यावेळी सांगितले बैठकीस इ .समाज बांधव समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.


0 Comments