google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात संगणक संचाचे उत्साहात उद्घाटन.

Breaking News

शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात संगणक संचाचे उत्साहात उद्घाटन.

 शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात संगणक संचाचे उत्साहात उद्घाटन.

सांगोला (प्रतिनिधी)आदर्श शिक्षण प्रसारक  प्रसारक मंडळ संचालित वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयास आमदार  निधीतून मिळालेल्या संगणक संचाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

सुरुवातीस प्रमुख मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव नीलकंठ शिंदे सर यांनी शाल, श्रीफळ देऊन केले.

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निधीतून प्रशालेस नुकतेच माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळेसाठी संगणक संच  ,एलसीडी प्रोजेक्टर, प्रिंटर व इतर साहित्य प्राप्त झाले  होते सदर साहित्याचे पूजन सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्क  प्रमुख सागर पाटील ,ह भ प सूर्यकांत भिसे व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील भोरे  सर ,संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, 

सचिव नीलकंठ शिंदे सर सहसचिव विठ्ठलपंत शिंदे सर या प्रमुख मान्यवरांनी पुष्पहार समर्पित करून ,श्रीफळ वाढवून केले.  यापुढील काळात देखील संस्थेस भरीव मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन सुनील भोरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश पवार सर व आभार प्रदर्शन संतोष कुंभार सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments