google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील " त्या " खडीक्रशर मालकावर गुन्हा दाखल होणार; मंडलाधिकाऱ्यांनी तहसिलदारांकडे सादर केला अहवाल !

Breaking News

सांगोल्यातील " त्या " खडीक्रशर मालकावर गुन्हा दाखल होणार; मंडलाधिकाऱ्यांनी तहसिलदारांकडे सादर केला अहवाल !

 सांगोल्यातील " त्या " खडीक्रशर मालकावर गुन्हा दाखल होणार;

मंडलाधिकाऱ्यांनी तहसिलदारांकडे सादर केला अहवाल  !

सांगोला तालुका/ प्रतिनिधी ; सांगोला तालुक्यातील कटफळ येथे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गेल्या ८ ते १० वर्षीपासून " रोहित स्टोन क्रशर " या नावाने राजरोसपणे खडी क्रशर सुरू आहे. 

कोणत्याही ठिकाणचा खाण पट्टा मंजूर नसताना शिंगुर्णी ता.माळशिरस येथील जमीन गट नं.७३१/२  या जमिनीत बेकायदेशीर उत्खनन केले म्हणून तात्कालीन  तहसिलदार माळशिरस यांनी अनिल महादेव देशमुख यांच्या ७/१२ उता-यावर क्र.गौण/एसआर/९६/२०१४ दि.१९/०७/२०१४ रोजीचे आदेशा अन्वये  दि.१२/५/२०१६ रोजीचे  फेरफार नं.२४१३ नुसार ५९,५३,२५७/- एवढ्या अनाधिकृत दगड उत्खनन दंडाचा बोजा चढवण्यात आला आहे.

तरीही " रोहित स्टोन क्रशर " चालकाने ह्या दंडात्मक कारवाईला न जुमानता माळशिरस व सांगोला तालुक्यातील काही महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगणमत करून हे अनाधिकृत खडी क्रशर सुरूच ठेवले होते. सांगोला तालुक्यातील काही नागरिकांनी या अनाधिकृत विनापरवाना सुरू असलेल्या खडी क्रशर बाबत

 तहसिलदार सांगोला यांच्याकडे तक्रारी अर्ज केल्यानंतर तहसिलदार सांगोला यांनी सदरचे रोहित स्टोन  खडी क्रशर दि.१८/०३/२०२०,२६/१२/२०२० व २४/१२/२०२१ रोजी सिल केल्याच्या  कागदपत्री नोंदी आहेत. मात्र सदरचे " रोहित स्टोन खडी क्रशर " हे आज ही राजरोसपणे सुरू आहे. 

मौजे कटफळ ता.सांगोला येथील जागेत औद्योगिक बिनशेती परवाना नसताना किंवा सदर खडी क्रशर साठी खाण पट्टा मंजूर नसताना व सदरचे खडी क्रशर सिल असताना  क्रशरसाठी सिध्देश्वर महादेव देशमुख यांच्या नावे बसविण्यात आलेल्या  मिटर कनेक्शन  

ग्राहक क्र 340410007211  या मिटरचे रिडींग (क्रशर सिल कालावधीत दि.१८/०३/२०२० ते १५/०८/२०२२ ) २,३२,२४१ युनिट लाईटचा वापर करण्यात आलेला आहे. एक ब्रास खडी तयार करण्यासाठी १९ युनिट वीज लागते. २,३२,२४१ युनिट विज वापरातून सुमारे १२,०००/- ब्रास खडी बेकायदेशीर रित्या तयार करण्यात आली आहे. 

त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. खडी क्रशर मालक व महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताशिवाय हे घडू शकत नाही.

त्यामुळे सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत तातडीने चौकशी करून संबंधीत खडी क्रशर जप्तीची कारवाई करून खडी क्रशर चालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, व संबंधित महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी “ अश्या आशयाचा अर्ज मा.तहसिलदार स़ांगोला यांच्या कडील 

दि.१९/०९/२०२२ रोजीचे लोकशाही दिनी व मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांच्याकडील ७/११/२०२२ रोजीचे लोकशाही दिनीअर्ज सादर केला होता परंतु सदर अर्जावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. उलट या अवैध खडी क्रशर चालकाला कारवाई पासून वाचण्यासाठी काही कर्मचारी मदत करत आहेत.

त्यामुळे सदर आशयाचा अर्ज आपल्याकडे सादर करत आहे.तरी सदर अर्जातील नमूद मुद्यांची तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.अन्यथा २६ जानेवारी २०२३ रोजी पासून सनदशीर मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अंदोलन करणार असलेचा इशारा देण्यात आला होता. 

सदर अंदोलनाची दखल घेवून तहसिलदार सांगोला यांनी सदर खडीक्रशर बाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश मंडल अधिकारी महुद बु.यांना दिला  होता. 

सदरच्या तहसीलदार सांगोला यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी महोदयांनी सदर खडी क्रेशर चालक-मालक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा अहवाल सादर केला आहे .त्यामुळे उद्या दि.२६ जानेवारी २०२३ पासून चे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील आंदोलन स्थगित करत असल्याची माहिती उमेश मंडले यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments