सांगोला नगरपरिषदेच्या वतीने १० वी व १२ वीच्या मुलींना शिष्यवृत्ती वाटप
असून यामुळे मुलींच्या शैक्षणिक सक्षमीकरणाकरिता हातभार लागणार आहे.तसेच मुलींना आर्थिक सहाय्य मिळाल्यास मुलींच्या उच्च शिक्षणासाठी देखील यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
सदर शिष्यवृत्ती वाटप हे नगरपरिषदेचे प्रशासक तथा तहसीलदार अभिजित पाटील आणि मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक विजय कन्हेरे, सभा अधीक्षक श्रीम.तृप्ती रसाळ, सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे,श्रीम.प्रतिभा कोरे, सर्व विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते.
शैक्षणिक सबलीकरणासाठी ही शिष्यवृत्ती मुलींना उपयुक्त ठरेल :
सांगोले नगरपरिषदेमार्फत वाटप करण्यात येत असलेली ही शिष्यवृत्ती मुलींच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असून नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत अन्य कोणत्याही नावीन्यपूर्ण कल्पना व सुचना असल्यास नगरपरिषदेस कळवावे,त्याच्या अंमलबजावणी साठी सर्व आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील. – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी
0 Comments