google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात गुप्तांग कापून युवकाचा निर्घृण खून

Breaking News

सांगोला तालुक्यात गुप्तांग कापून युवकाचा निर्घृण खून

सांगोला तालुक्यात गुप्तांग कापून युवकाचा निर्घृण खून

सांगोला :- सांगोला शहरातील एखतपूर- आचकदाणी रोडवर अज्ञात व्यतीकडून ३४ वर्षीय तरुणाचा गुप्तांग कापून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री २ च्या सुमारास उघडकीस आली.

मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या तरुणाच्या खुनामूळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संजय तुकाराम इंगोले (वय ३४, रा. एखतपूर) असे खून करण्यात आलेल्‍या तरुणाचे नाव आहे. सांगोला पोलीस स्टेशनचे कर्मचारी एखतपूर ते अचकदाणी रोडवर शनिवारी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना आचकदाणी रोड लगत एक तरुण मृत अवस्थेत दिसून आला. 

त्यांनी त्याच्या जवळ जाऊन पाहिले असता सदरचा प्रकार उघडकीस आला. यानंतर घटनेची माहिती पोलीस ठाण्यात नोंद केली. हा खून कोणाकडून करण्यात आला आहे आणि का केला आहे हे अद्याप समोर आले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments